पुणेकर अनुभवतायेत सखी, पेंटिंग आणि तालीमचे ‘तरंग’

महाविद्यालयातील २५ विद्यार्थ्यांची विविध विषयांवरील शंभरहून अधिक छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.

पुणेकर अनुभवतायेत सखी, पेंटिंग आणि तालीमचे ‘तरंग’
Photography Exibition

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (Fergusson College) छायाचित्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांनी काढलेल्या निवडक छायाचित्रांच्या 'तरंग' या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार सागर गोटखिंडीकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे करण्यात आले. महाविद्यालयातील २५ विद्यार्थ्यांची (Students) विविध विषयांवरील शंभरहून अधिक छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. (An exhibition of photographs taken by students at Ferguson College)

सखी, पेंटिंग आणि तालीम या अनुक्रमे पियुष गोगावले, भुवनेश्वरी चव्हाण, शिवम निकम यांनी छायाचित्रातून साकारलेल्या कथा हे या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संचालक मिलिंद कांबळे,  समन्वयिका डॉ. अलका देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

यावेळी बोलताना गोटखिंडीकर म्हणाले, ‘छायाचित्रकारांनी आपल्या कलेतून सांस्कृतिक वारसाचे जतन केले पाहिजे.’ तर कलाकार हा दिव्यासारखा स्वयंप्रकाशित असतो, तो इतरांनाही प्रकाश देतो. कलाकारांनी आपल्या मुळाशी जाऊन नाते घट्ट केले पाहिजे, असे कुंटे यांनी सांगितले. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण कला दालनात २३ एप्रिल पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले राहणार आहे.