अबब ! प्राध्यापक भरतीसाठी 5501 अर्ज; केमेस्ट्रीसाठी 1038, फिजिक्सला 764 ,झुलॉजी 523, मराठी विषयासाठी 371 अर्ज 

उपलब्ध जागांच्या तुलनेत प्राप्त अर्जांची संख्या पाहता प्राध्यापक भरातीमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

अबब ! प्राध्यापक भरतीसाठी 5501 अर्ज; केमेस्ट्रीसाठी 1038, फिजिक्सला 764 ,झुलॉजी 523, मराठी विषयासाठी 371 अर्ज 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) विविध विभागातील प्राध्यापक (professor)पदाच्या 111 जागांसाठी अर्ज करण्याची मुदत संपली असून दिलेल्या मुदतीत विद्यापीठाकडे 5 हजार 501 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात केमेस्ट्री (Chemistry) विषयासाठी सर्वाधिक 1 हजार 38, फिजिक्ससाठी (Physics)764 तर झुलॉजीसाठी (Zoology) 523 अर्ज , मराठी (Marathi)विषयासाठी 371 आणि बॉटनीसाठी (Botany)265 अर्ज आले आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.विजय खरे (Registrar Dr. Vijay Khare)यांनी एज्युवार्ताशी बोलताना दिली.दरम्यान,उपलब्ध जागांच्या तुलनेत प्राप्त अर्जांची संख्या पाहता प्राध्यापक भरातीमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

पुणे विद्यापीठातील विविध विभागामधील प्राध्यापकांच्या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.त्यासाठी 16 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती.तसेच अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्यासाठी 29 फेब्रुवारीपर्यंत मुदत होती.दिलेल्या मुदतीत उमेदवारांनी अर्ज जमा करणे व पोस्टाने पाठवणे अपेक्षित होते.मात्र, 1 मार्च रोजी सुध्दा विद्यापीठाकडे पोस्टाने काही अर्ज येत होते.परंतु, 29 फेब्रुवारीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार विद्यापीठातर्फे केला जाणार नसल्याचे विद्यापीठाने यापूर्वीच स्पष्ट केले होते,असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : प्राध्यापकांसाठी गोड बातमी; त्या 78 नॉन-ग्रँट कॉलेजला मिळणार ग्रँट?

विद्यापीठाकडून प्राप्त अर्जाची छाणणी केली जाईल.तब्बल  साडेपाच हजार अर्ज आल्यामुळे छाणणी प्रक्रियेसाठी सुध्दा बराच कालावधी लागणार आहे.त्यातच पुढील काही दिवसात लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे.मात्र,या कालावधीत अर्जाची छाणणी व मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते,असे बोलले जात आहे. 

--------------------

विद्यापीठाकडे प्राप्त झालले विषय निहाय अर्ज 

अँथ्रोलॉजी - 44 ,बायोलॉजी - 170, बॉटनी -265, सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट - 42 ,सेंटर ऑफ ऍडव्हान्स स्टडीज अँड संस्कृत  -46 ,केमिस्ट्री - 1038 ,कम्युनिकेशन अँड जर्नलिझम -126 ,डिफेन्स आणि स्टार्टरजी स्टडीज -54, डिपार्टमेंट ऑफ हेल्थ सायन्स - 5 ,डिपार्टमेंट ऑफ पाली  -55,  डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल अँड सायन्स - 246 ,डिपार्टमेंट ऑफ वुमन अँड जेंडर स्टडीज -11, इकॉनॉमिक्स -51, एज्युकेशन -25, इंग्लिश - 108, इन्व्हाईटमेंट सायन्स -13, फॉरेन लॅंग्वेज -80 , हिंदी -19, इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स -14 ,लॉ - 76 ,लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स -131 ,मराठी - 371 ,मॅथेमॅटिक्स 206, मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज -206, मायक्रोबायोलॉजी -98 ,फिलॉसॉफी - 67 ,फिजिक्स - 764 ,सायकॉलॉजी -103 ,सोशियोलॉजी - 141, स्टॅटिस्टिक्स -135,  झूलॉजी -523
---------------------

नामांकित विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागामधील शिक्षकीय 
पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विद्यापीठाने दिलेल्या मुदतीमध्ये एकूण 5501 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.अनेक विभागातील पदांसाठी 500 पेक्षा जास्त अर्ज आले आहेत.आता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या नेतृत्त्वाखाली भरतीची पुढील प्रक्रिया अंमलात आणली जाईल. 
                     
-डॉ विजय खरे, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ