अन्न व औषध प्रशासन विभागात विविध पदांच्या भरतीसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू 

सोमवार दि. २३ सप्टेंबरपासून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अन्न व औषध प्रशासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.fda.maharashtra.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ ऑक्टोबर देण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागात विविध पदांच्या भरतीसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सरकारी नोकरीच्या शोधात असणार्‍या तरूणांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील (Department of Food and Drug Administration) रिक्त जागांच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया (Recruitment process started) राबवण्यात येत आहे. त्यासाठी आज सोमवार दि. २३ सप्टेंबरपासून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अन्न व औषध प्रशासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.fda.maharashtra.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ ऑक्टोबर (Deadline October 22) आहे.

या भरतीद्वारे विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ तांत्रिक सहायक या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळांमधील पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. वरिष्ठ तांत्रिक सहायक पदाच्या ३७ जागा आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदाच्या १९ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 

विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी आणि रसायन शास्त्र किंवा जीव-रसायनशास्त्रातील  पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी प्राप्त केल्यानंतर उमेदवाराकडे औषधी द्रव्ये विश्लेषणाचा दीड वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाक पदासाठी अर्ज करणाऱ्यांकडे विज्ञान शाखेतील द्वितीय श्रेणीतील पदवी असणे आवश्यक आहे. औषध निर्माण शास्त्राचे पदवीधारक विद्यार्थी अर्ज दाखल करू शकतात. 

या दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी  १ हजार रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. तसेच उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्ष या दरम्यान असणे आवश्यक आहे. मागासवर्गीय, खेळाडू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी ५ वर्षे वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती प्रक्रियेबाबतची मूळ जाहिरात उमेदवारांनी वाचणे आवश्यक आहे.