ऐकावं ते नवलंच ! शाळेच्या अभ्यासक्रमात रोहित शर्माचा धडा, विश्वास बसत नसेल तर सविस्तर वाचा.. 

तामिळनाडूमधील 11वीच्या विद्यार्थ्यांना रोहित शर्माच्या नावाने शिकवला जातो धडा.

ऐकावं ते नवलंच ! शाळेच्या अभ्यासक्रमात रोहित शर्माचा धडा, विश्वास बसत नसेल तर सविस्तर वाचा.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

तामिळनाडूमधील 11वीच्या विद्यार्थ्यांना (11th student from Tamil Nadu) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावाने धडा शिकवला जातोय. गणित विषय पुस्तकाच्या (Mathematics subject book) ४५ पानांवर “Balls and Runs." What a celebration, what a relation! What a function! या मथळ्याखाली रोहित शर्माचा धडा आहे. यामध्ये रोहित शर्माची कामगिरी देण्यात आली आहे. यामागे विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. 

भारतीय संघाचा कर्णधार आणि सर्वोत्तम फलंदाज रोहित शर्माचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. सध्या सोशल मीडियावर रोहितचा एक फोटो वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित शर्माच्या नावाचा धडा शाळेच्या पुस्तकात असल्याचे दिसून येते. 

11 वीच्या गणिताच्या पुस्तकात रोहित शर्मावर चॅप्टर आहे. त्यामध्ये रोहित शर्मानं टी 20 क्रिकेटमध्ये ठोकलेल्या शतकाची माहिती देण्यात आली आहे. रोहित शर्मानं 2017 मध्ये श्रीलंकेविरोधात अवघ्या 35 चेंडूत शतक ठोकले होते. त्या खेळीचे वर्णन यामध्ये करण्यात आले. रोहित शर्मा त्या शतकी खेळीमध्ये 10 चौकार आणि 12 षटकार ठोकले होते. ही खेळी विलक्षण कौशल्य आणि सामर्थ्य दाखवणारी होती. सर्वात लहान फॉरमॅटमध्ये खेळावर वर्चस्व गाजवण्याची रोहितची क्षमता, त्यातून स्पष्ट होत असल्याचे  म्हटले.

रोहित शर्मानं अवघ्या 35 चेंडूमध्ये ठोकलेले रेकॉर्डब्रेक शतक आता 11 वी वर्गाच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकात सामाविष्ठ करण्यात आले. हे शतक रोहित शर्माच्या अविश्वसनीय फलंदाजीचे पराक्रम आणि सर्वात लहान स्वरूपातील खेळावर वर्चस्व गाजवण्याच्या क्षमतेचा पुरावा देते.