अमेरिका, कॅनडा नाही तर 'हा' देश आहे भारतीय विद्यार्थ्यांसाठी ठरतोय 'फेव्हरेट स्टडी डेस्टीनेशन'
भारतीय विद्यार्थ्यांमध्ये ऑस्ट्रेलियाची लोकप्रियता वाढण्याचे कारण म्हणजे आता तेथील सरकारने अभ्यासानंतर काम करण्याचे नियम सोपे केले आहेत. आता ज्यांना तिथे कामाची गरज आहे त्यांना ते सहज मिळते. तसेच, इतर देशांच्या तुलनेत ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेणे थोडे स्वस्त आहे. आयडीपी एज्युकेशनने 'इमर्जिंग फ्युचर्स सेव्हन - व्हॉइस ऑफ द इंटरनॅशनल स्टुडंट' या शीर्षकाचे एक संशोधन केले, ज्यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या देशांची नावे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या सर्वेक्षणात १०६ देशांमधील ६,००० हून अधिक विद्यार्थ्यांशी बोलण्यात आले. यामध्ये भारतातील सुमारे १,४०० विद्यार्थ्यांचा समावेश होता. संशोधनातून असे दिसून आले आहे की ७७% भारतीय विद्यार्थी चांगल्या नोकऱ्या मिळविण्यासाठी आणि अधिक पैसे कमविण्यासाठी परदेशात शिक्षण घेऊ इच्छितात.
आयडीपी सर्वेक्षणात ऑस्ट्रेलिया हा अभ्यासासाठी सर्वात लोकप्रिय देश आहे. सर्वेक्षणांनुसार २८% भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेऊ इच्छितात. २२% सह अमेरिका दुसऱ्या आणि २१% सह ब्रिटन तिसऱ्या क्रमांकावर आहे. कॅनडा १३% सह चौथ्या आणि न्यूझीलंड ५% सह पाचव्या स्थानावर आहे. या वर्षी फक्त ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.