एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शैक्षणिक सत्र 2026-27 पासून बॅचलर ऑफ एज्युकेशन (Bachelor of Education) म्हणजेच बीएडचे स्वरूप आणि अभ्यासक्रम बदलणार आहे. (The format and curriculum will change) नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (National Education Policy) NEP-2020 अंतर्गत प्रस्तावित बदलामध्ये दहा वर्षांनंतर B.Ed कोर्स पुन्हा एक वर्षाचा होणार आहे. (B.Ed course to be one year again) बीएड महाविद्यालयांसाठी 2025 पासून नवीन बदलांची अधिसूचना लवकरच जारी केली जाणार आहे. यामध्ये चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचे (एनसीटीई) अध्यक्ष प्रा. पंकज अरोरा यांनी ही माहिती दिली. अरोरा म्हणाले, शिक्षक पात्रता चाचणी (TET) च्या नियम आणि निकषांमध्ये देखील बदल केले जाणार आहेत. हे बदल 2027 मध्ये चार वर्षांच्या एकात्मिक पदवी उमेदवारांच्या बॅचच्या आधी केले जातील. शैक्षणिक धोरणांतर्गत, पायाभूत, पूर्वतयारी, मध्यम आणि माध्यमिक स्तर या चार भागांनुसार शिक्षक तयार केले जातील. पदवीपूर्व अभ्यासक्रमातील बदलांमुळे विविध बीएड कार्यक्रम पुन्हा सुरू केले जात आहेत.
या विद्यार्थ्यांना मिळेल बीएडला प्रवेश
* एका वर्षात बीएड : चार वर्षांचा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश घेता येईल.
* दोन वर्षांत बीएड : तीन वर्षांच्या पदवीधर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. पदवीनंतर शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना लाभ मिळेल.
- M.Ed पदवी: चार वर्षांचे एकात्मिक B.Ed आणि दोन वर्षांचे B.Ed शिकणारे विद्यार्थी त्यात प्रवेश घेऊ शकतील.
या अभ्यासक्रमांचा विस्तार करण्यात येणार आहे
बीए-बीएड, बीएससी-बीएड आणि बीकॉम-बीएडची पहिली बॅच 2023 मध्ये सुरू झाली आहे. 2025 पासून त्यात शारीरिक शिक्षण, कला शिक्षण, योगशिक्षण आणि संस्कृत शिक्षण हे चार नवीन स्पेशलायझेशन अभ्यासक्रम जोडले जातील. बारावीनंतर शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश घेता येणार आहे.