विद्यार्थ्यांना JEE Mains परीक्षा या कारणाने देता येणार नाही

परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात येताना  बूट, पूर्ण बाह्यांचे शर्ट, मोठे बटणे असलेले कपडे आणि गडद रंगाचे कपडे घालू नयेत, असे सांगण्यात आले आहे. तसेच महिला उमेदवारांना  जीन्स, सलवार सूट, कुर्ता, लांब स्कर्ट, ट्राउझर्स, टी-शर्ट, शर्ट अशा कपड्यांना  परवानगी देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना JEE Mains परीक्षा या कारणाने देता येणार नाही

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 जेईई मेन २०२५ सत्र १ ची रीक्षा उद्या म्हणजे  २२ जानेवारीपासून सुरू होणार आहे. (JEE Main 2025 Session 1 exam will start tomorrow) या परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेने (National Testing Agency) NTA  मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. (Guidelines have been issued) सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काळजीपूर्वक वाचन करावे आणि त्यांचे पूर्णपणे पालन करावे. कोणत्याही अनियमिततेबाबत विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाऊ शकते किंवा त्यांना परीक्षेस बसण्यापासून रोखले जाऊ शकते, असा इशारा NTA ने दिला आहे. 

परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात येताना  बूट, पूर्ण बाह्यांचे शर्ट, मोठे बटणे असलेले कपडे आणि गडद रंगाचे कपडे घालू नयेत, असे सांगण्यात आले आहे. तसेच महिला उमेदवारांना  जीन्स, सलवार सूट, कुर्ता, लांब स्कर्ट, ट्राउझर्स, टी-शर्ट, शर्ट अशा कपड्यांना  परवानगी देण्यात आली आहे. मात्र  दागिने घालण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये  किरपाण, मंगळसूत्र, जोडवे  या दागिन्यांना परवानगी देण्यात आली आहे. 

NTA ने आपल्या निवेदनात विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. परीक्षेच्या दिवशी वेळेच्या आधी परीक्षा केंद्रावर हजर राहावे. जर तुम्ही एका मिनिटानेही उशिरा आलात तर तुम्हाला परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही, असे आयोगाने म्हटले आहे. 

पहिली पाळी सकाळी ९:०० ते दुपारी १२:०० आणि दुसरी पाळी दुपारी ३:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत असेल. उमेदवारांना एक तास आधी केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्राचे गेट नियोजित वेळेच्या ३० मिनिटे आधी बंद केले जाईल. पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी ७:०० ते ८:३० आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी १:०० ते २:३० पर्यंत प्रवेश दिला जाईल.

तुमचे प्रवेशपत्र आणि ओळखपत्र तुमच्यासोबत ठेवा.
परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्राची एक प्रत आणि वैध ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे जेणेकरून तुमची पडताळणी करता येईल. प्रवेशपत्र आणि ओळखपत्राशिवाय तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.