IDBI बँकेत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदासाठी मेगा भरती   

कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM), ग्रेड 'O' पदांसाठी सविस्तर जाहिरात IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवार वेबसाइटवरून जाहिरातीची पीडीफ डाउनलोड करू शकतात. 

IDBI बँकेत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदासाठी मेगा भरती   

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आयडीबीआय बँकेने ज्युनियर असिस्टंट मॅनेजर जेएएम ग्रेड ओ पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. (IDBI Bank Recruitment for Junior Assistant Manager JAM Grade O Posts) देशभरात  कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापकाच्या एकूण ६७६ रिक्त पदे भरण्यात येणार  आहेत.

आयडीबीआय बँक जेएएम २०२५ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया उद्या  ८ मे २०२५ पासून सुरू होईल.  इच्छुक आणि पात्र उमेदवार  या पदांसाठी २० मे २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकता. या पदांसाठी निवड उमेदवारांच्या ऑनलाइन चाचणी (OT), कागदपत्र पडताळणी (DV), वैयक्तिक मुलाखत (PI) आणि भरतीपूर्व वैद्यकीय चाचणी  (PRMT) मधील कामगिरीच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षा ८ जून २०२५ रोजी देशभरात घेतली जाईल. 

कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM), ग्रेड 'O' पदांसाठी सविस्तर जाहिरात IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवार वेबसाइटवरून जाहिरातीची पीडीफ डाउनलोड करू शकतात. अर्जदारांकडे AICTE, UGC इत्यादी सरकार संस्थांद्वारे, मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.  सामान्य, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी किमान ६०% गुणांसह (SC/ST/PWBD उमेदवारांसाठी ५५%) उत्तीर्ण  असणे आवश्यक आहे. केवळ डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण होणे हे पात्रता निकषांमध्ये पात्र मानले जाणार नाही. उमेदवारांना संगणकात प्रवीणता असणे अपेक्षित आहे.