गुरुजींच्या घराची वास्तुशांती, चक्क शाळेलाच दिली सुट्टी, पालक संतप्त 

सोलापूर जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या गुरुजींनी स्वत:च्या घराच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी चक्क शाळेलाच सुट्टी दिलीअसल्याची माहिती समोर आली आहे. 

गुरुजींच्या घराची वास्तुशांती, चक्क शाळेलाच दिली सुट्टी, पालक संतप्त 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सोलापूर जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद (Solapur district ZP School) शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या गुरुजींनी स्वत:च्या घराच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी चक्क शाळेलाच सुट्टी दिली (School leave for personal work) असल्याची माहिती समोर आली आहे.  महिन्याकाठी लाखो रुपयाचा पगार घेणाऱ्या शिक्षकाच्या वैयक्तिक कार्यक्रमासाठी चक्क शाळेला सुट्टी देणं किंवा यात केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांनी सहकार्याची भूमिका घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल पालकांमधून व्यक्त केला जात आहे.  

अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथे हा प्रकार घडला आहे. तडवळ येथे जि. प. प्राथमिक मराठी शाळा असून मराठीचे पहिली ते चौथी आणि कन्नड माध्यमाचे पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेत एकूण बारा शिक्षक आणि मुख्याध्यापक कार्यरत आहेत. जिल्हा परिषद आदर्श शिक्षक म्हणून वेतन वाढ मिळवलेल्या एका शिक्षकाच्या नवीन घराची सोमवारी वास्तुशांती होती. प्रत्येक शिक्षकाला या कार्यक्रमासाठी जाणं अनिवार्य होतं पण करायचं कसं असा प्रश्न सगळ्यांसमोर होता. त्या ठिकाणी चांगलीच शक्कल लढवण्यात आली आणि चक्क शालेय समितीच्या अध्यक्षालाच फसवून सही घेतली. तडवळ गावची यात्रा आहे म्हणून सोमवारी शाळेला सुट्टी देण्यात आली.

गावची यात्रा हे फक्त कारण होते, मात्र शिक्षकांच्या वास्तूशांतीसाठी ही सुट्टी घेण्यात आल्याचे समजल्यावर या बनवाबनवीच्या कारनाम्यावर गावकरी संतप्त झाले. चक्क केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांच्या संगनमतानेच या सर्व बाबी पालकांसह सरपंचांसमोर आल्या. तेव्हा सर्व काही बनवाबनवीचे बिंग फुटले. त्यानंतर आता शिक्षणाधिकारी कठोर कारवाई करणार का?, का केवळ बघ्याची भूमिका घेऊन बनवाबनवी करणाऱ्या शिक्षकांना पाठीशी घालणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.