युवा विकसीत भारताचा दुत बनला पाहिजे

विद्यार्थांसाठी अनेक योजना उपलब्ध असून उद्योग धंद्यासाठी आर्थिक व व्यवस्थापकीय अशा सर्व स्तरीय मदत मिळू शकते.

युवा विकसीत भारताचा दुत बनला पाहिजे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

युवा पिढी भारत घडवत असताना गरीबी निर्मूलन, साक्षरता, सतत काम करण्याची वृत्ती हे विकसीत भारताचे आधारस्तंभ आहेत. यामुळे भारताची लोकशाही ही तिसऱ्या स्थानावरुन पुढे जाईल. यासाठी प्रत्येक युवा विकसीत भारताचा दुत बनला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरण रिजुजु यांनी केले. 

विकसीत भारत युवा कनेक्ट या कार्यक्रमा अंतर्गत केंद्रीय मंत्री किरण रिजुजु यांनी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमास सोसायटीचे कार्याध्यक्ष डाॅ.गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा शामकांत देशमुख,सहकार्यवाह डाॅ जोत्स्ना एकबोटे, प्रा सुरेश तोडकर, प्राचार्य डाॅ. राजेंद्र झुंजाराव, प्राचार्य डाॅ. संजय खरात, प्राचार्य डाॅ. कल्याणी जोशी आदी उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना श्री किरण रिजुजु म्हणाले, विद्यार्थांसाठी अनेक योजना उपलब्ध असून उद्योग धंद्यासाठी आर्थिक व व्यवस्थापकीय अशा सर्व स्तरीय मदत मिळू शकते. त्यासाठी एक ' सिंगल विंडो' प्लॅटफाॅर्म आहे. त्यामध्ये सी व्ही बनवणे, एक्सपिरीएनशीएल लर्निंग, ईंटनशीप अशी वेगवेगळी मदत उपलब्ध आहे. भारत एआय मध्ये अव्वल क्रमांकावर असून जगातील तिसरी मोठी आर्थिक सत्ता आहे. अजून प्रगत होऊया व उद्योगजक बनुयात, असेही त्यांनी सांगितले. 


डाॅ.गजानन एकबोटे यांनी पी ई सोसायटीच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांकडून आत्मनिर्भर होण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे संयोजन डाॅ.निवेदिता एकबोटे यांनी केली.