पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
सागर पाटील हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असून गेल्या चार वर्षापासून तो पुण्यात राहत होता. नवी पेठ येथे सागर मित्रांबरोबर राहत होता. शुक्रवारी खोलीचा दरवाजा बंद होता.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुणे शहर हे प्रमुख केंद्र बनले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यात 26 वर्षीय सागर पवार (Sagar Pawar) या एमपीएससीचा (MPSC)अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती शुक्रवारी समोर आली. नवी पेठ येथील घरात त्याने नैराश्यातून आत्महत्या (suicide)केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
सागर पाटील हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असून गेल्या चार वर्षापासून तो पुण्यात राहत होता. नवी पेठ येथे सागर मित्रांबरोबर राहत होता. शुक्रवारी खोलीचा दरवाजा बंद होता. दुपारी मित्रांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तसेच अनेकवेळा दरवाजा वाजवला,परंतु, आतून सागरने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मित्रांनी या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. पोलिसांनी दरवाजा तोडला. त्यावेळी सागरने गळफास घेतल्याचे आढळून आले.
सागरच्या आत्महत्येचे कारण निश्चित समजू शकले नाही. पोलिसांकडून त्याच्या मित्रांकडे चौकशी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात होता. नैराश्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, घडलेल्या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली असून विश्रामबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
eduvarta@gmail.com