SPPU सेट विभागाच्या समन्वयक पदी डॉ.अविनाश कुंभार
गेल्या काही महिन्यांपूर्वी सेट विभागाचे समन्वयक डॉ. बाळासाहेब कापडणीस यांनी राजीनामा दिला होता.मात्र, विद्यापीठाकडून नवीन समन्वयक शोधण्याची प्रक्रिया सुरू होती. अखेर डॉ. अविनाश कुंभार हे सेट परीक्षेसाठी समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)सेट विभागाच्या (SET department)समन्वयक पदी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. अविनाश कुंभार (Former Head of the Department of Chemistry Dr. Avinash Kumbhar)यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कुंभार यांनी 1 डिसेंबर रोजी माजी समन्वयक डॉ. बाळासाहेब कापडणीस (Dr. Balasaheb Kapdanis)यांच्याकडून समन्वयक पदाची सूत्रे हाती घेतली.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे आयोजित केली जाते.आत्तापर्यंत तब्बल 40 सेट परीक्षा घेण्यात आल्या आहेत.दरवर्षी सुमारे एक ते सव्वा लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी नोंदणी करतात.महाराष्ट्र व गोवा राज्यातील प्रमुख शहरांमध्ये या परीक्षेचे आयोजन केले जाते.गेल्या काही महिन्यांपूर्वी सेट विभागाचे समन्वयक डॉ. बाळासाहेब कापडणीस यांनी राजीनामा दिला होता.मात्र, विद्यापीठाकडून नवीन समन्वयक शोधण्याची प्रक्रिया सुरू होती. अखेर डॉ. अविनाश कुंभार हे सेट परीक्षेसाठी समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठातील वरिष्ठ व अनुभवी प्राध्यापकाची सेट विभागाच्या समन्वयक पदी नियुक्ती केली जाते.डॉ. कापडणीस हे सुमारे 10 वर्ष या पदावर कार्यरत होते.आता काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या डॉ. अविनाश कुंभार यांच्याकडे ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, सेट परीक्षा वर्षातून दोन वेळा घ्यावी,अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते.मात्र राज्यात प्राध्यापकांच्या किती रिक्त जागा आहेत. यांचा आढावा घेतला जात आहे.त्यानुसार राज्य शासनाकडून सेट परीक्षा आयोजित करण्याबाबत परवानगी प्राप्त झाल्यानंतर पुढील सेट परीक्षा घेण्यात येणार आहे.सर्व साधारणपणे डिसेंबर महिन्यात सेट परीक्षेचे आयोजन केले जाते. मात्र, शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी बराच कालावधी लागतो.त्यामुळे सुमारे दोन महिने तरी परीक्षा घेणे शक्य नाही, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
eduvarta@gmail.com