पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास 'या' तारखेपर्यंत दिली मुदतवाढ
गृह विभागाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, आता अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ डिसेंबर २०२५ करण्यात आली आहे. यासोबतच, अर्ज शुल्क भरण्यासाठी उमेदवारांना १० डिसेंबर २०२५ पर्यंत अतिरिक्त वेळ मिळाला आहे. अर्ज सादर करण्यात अडचण आलेल्या उमेदवारांसाठी ही खरोखरच मोठी सुवर्णसंधी आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पोलीस दलात भरती (Maharashtra Police Recruitment- 2025) होण्याचं महाराष्ट्रातील हजारो तरुणांचं स्वप्न असतं. जर तुमचे देखील पोलीस होण्याचं स्वप्न असेल आणि तुम्ही अद्याप पोलीस भरतीचा अर्ज भरला नसेल (Last chance to fill out the application form) तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन निर्णयानुसार, महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ मधील अर्ज करण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात (Extension until 7th December ) आली आहे. या भरतीत १५ हजार ६३१ पद भरले जाणार (15 thousand 631 posts) आहेत.
हेही वाचा - इतिहास घडला! नागपूर विद्यापीठाला पहिल्यांदाच महिला कुलगुरू, कोण आहेत डॉ. मनाली क्षीरसागर
यापूर्वी देण्यात आलेली अर्जाची मुदत संपुष्टात आल्यानंतर आता पुन्हा त्यामध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे. काही कारणांमुळे अद्याप अर्ज न भरू शकलेल्या उमेदवारांना ही शेवटची संधी असणार आहे. गृह विभागाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, आता अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ डिसेंबर २०२५ करण्यात आली आहे. यासोबतच, अर्ज शुल्क भरण्यासाठी उमेदवारांना १० डिसेंबर २०२५ पर्यंत अतिरिक्त वेळ मिळाला आहे. अर्ज सादर करण्यात अडचण आलेल्या उमेदवारांसाठी ही खरोखरच मोठी सुवर्णसंधी आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी policerecruitment2025.mahait.org किंवा mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर जाऊन अर्ज भरावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
या भरती अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल - 12 हजार 399 पदे, पोलीस कॉन्स्टेबल चालक- 234 पदे, जेल कॉन्स्टेबल- 580 पदे, SRPF कॉन्स्टेबल- 2 हजार 393 पदे आणि पोलीस बँड्समन 25 पदे अशी एकूण १५ हजार ६३१ पदे भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तर वय 18 ते 28 वर्षे भरती नियमानुसार आरक्षित उमेदवारांना सवलत देण्यात येणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये, आरक्षित वर्गासाठी ३५० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
eduvarta@gmail.com