IIT मुंबई कॅम्पस मुलाखती सुरू, पहिल्याच दिवशी १.४८ कोटी वेतनाची प्लेसमेंट
आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आयआयटी मुंबईच्या कॅम्पस मुलाखतींच्या पहिल्याच दिवशी जवळपास ९८ विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या. तसेच आणखी ७० विद्यार्थ्यांची नोकरीसाठी अंतिम निवड झाली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईमध्ये (आयआयटी मुंबई) हिवाळी प्लेसमेंट मुलाखती सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी १.४८ कोटी रुपये वेतन सर्वाधिक वेतनाचा प्रस्ताव (Salary of Rs 1.48 crores, highest salary proposal) ठरला. दा व्हिन्सी या कंपनीने ही प्लेसमेंट दिली आहे. पहिल्या दिवशीचा हा कॅम्पस मुलाखत मेळावा (IIT Mumbai Campus Interview) विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरला आहे. यावेळी ४२ नामांकित कंपन्या सहभागी (42 renowned companies participating) झाल्या होत्या तर ९८ विद्यार्थ्यांना नोकरीचे प्रस्ताव मिळाले.
आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आयआयटी मुंबईच्या कॅम्पस मुलाखतींच्या पहिल्याच दिवशी जवळपास ९८ विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या. तसेच आणखी ७० विद्यार्थ्यांची नोकरीसाठी अंतिम निवड झाली. मात्र पुढील काही दिवसांत अधिक चांगली नोकरी मिळण्याची शक्यता असल्याने या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रस्ताव स्वीकारलेले नाहीत.
हेही वाचा - राजनाथ सिंह यांनी विचारला गणिताचा एक प्रश्न अन् ६६० ट्रेनी IAS अधिकारी गेले गोंधळून
आयआयटी मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, यंदा कंपन्यानी प्रामुख्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंगचे (एमएल) चांगले ज्ञान असलेल्या उमेदवारांकडे अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंट माहिती पुस्तिकेनुसार विविध अभ्यासक्रमांचे २३०० हून अधिक विद्यार्थी यंदा प्लेसमेंटसाठी पात्र ठरले. विद्युत अभियांत्रिकी विभागात पात्र उमेदवारांची संख्या सर्वाधिक असल्याचेही सूत्रांनी सांगितले. यंदा प्रथमच प्लेसमेंट हंगामात आंतरवासितासाठी (इंटर्न) संधीही देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मते, या नव्या उपक्रमामुळे कंपन्यांचा सहभाग वाढला असून विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पहिल्या दिवशी फ्लिपकार्ट, जे. पी. मॉर्गन, बार्कलेज आणि क्वालकॉम यासारख्या मोठ्या कंपन्यांनी मुलाखती व निवड प्रक्रियेत सहभाग घेतला. त्याचबरोबर जीई, एअरबस आणि बार्कलेज या कंपन्यांनी नियोजित मुलाखतींबरोबरच वॉक-इन प्रक्रिया देखील घेतली. प्लेसमेंटच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा जवळपास ३५ हून अधिक कंपन्या प्लेसमेंट प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्या. दुसऱ्या दिवशी एलॉन मस्कच्या मालकीची जागतिक इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्ला दुसऱ्या दिवशी सर्वाधिक नोकरीची संधी देणाऱ्या कंपनीपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंटच्या हंगामाच्या पहिल्या दिवशी जाहीर झालेल्या नोकऱ्यांसदर्भातील आयआयटी मुंबईने अधिकृतरित्या कोणतीही माहिती जाहीर केली नाही.
eduvarta@gmail.com