पुण्यात खळबळ! हिंजवडी येथील नामांकित शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी
पोलीस, बॉम्बशोधक पथक आणि डाॅग स्काॅड पथक शाळेची कसून तपासणी करत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. ही धमकी कोणत्या दहशतवादी संघटनेने दिली का? का कोणी खोडसाळपणा केला याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आली नाही.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
आज सकाळच्या सुमाराच पुण्यातील एका शाळेला बाॅम्बने उडवण्याची धमकी (Threat to blow up school with a bomb) देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हिंजवडी फेज १ मधील एका नामांकित आंतरराष्ट्रीय शाळेला (Reputable schools in Hinjewadi Phase) बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. शाळेच्या ई-मेलवर धमकीचा संदेश आल्यानंतर (The school received a threatening e-mail) शाळा प्रशासनाने तात्काळ पिंपरी-चिंचवड पोलिसांना (Pimpri-Chinchwad Police) माहिती दिली. पोलिसांनी शाळेला ताब्यात घेऊन परिसराची तपासणी सुरू केली असून, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.
पोलीस, बॉम्बशोधक पथक आणि डाॅग स्काॅड पथक शाळेची कसून तपासणी करत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. ही धमकी कोणत्या दहशतवादी संघटनेने दिली का? का कोणी खोडसाळपणा केला याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आली नाही. त्यामुळे हा ई-मेल पाठवण्यामागे नेमकं काय कारण आहे. मेल कोणी पाठवला? पाठवण्यामागचा उद्देश काय होता? यासारख्या अनेक प्रश्नाची उत्तरे ही तपास पूर्ण झाल्यावरच समोर येतील.
काही दिवसांपूर्वीच औंध येथील सिटी इंटरनॅशनल स्कूल,ला एक धमकीचा ईमेल आला होता. आता ज्या प्रमाणे शाळेच्या ई-मेल आयडीवर मेल आला आहे, सेम त्याचप्रमाणे शाळेच्या ईमेल आयडीवर हा मेल आला होता. मेलमध्ये लिहिले होते, "शाळेच्या परिसरात शक्तिशाली स्फोटके ठेवले आहेत. सकाळी इमारत रिकामी करा, अन्यथा आत असलेल्या लोकांचे मृत्यू होतील, हात-पाय उडतील किंवा डोकीही उडतील. आम्ही 'रोडकिल' * आणि 'क्यो' या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहोत. हा मेसेज मीडिया हाऊसना द्या," असा उल्लेख सदर मेलमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे हिंजवडी येथील शाळेला दिलेल्या धमकीचा आणि याचा प्रकार सारखाच आहे का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
eduvarta@gmail.com