'शांतता..पुणेकर वाचत आहेत' उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
एनबीटीच्या वतीने पुणे पुस्तक महोत्सव फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर येत्या १३ ते २२ डिसेंबर या कालावधीत होत आहे. या अनुषंगाने शांतता पुणेकर वाचत आहेत' हा उपक्रम येत्या ९ डिसेंबरला सकाळी ११ ते १२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुणे पुस्तक महोत्सव (Pune Book Festival) हा आता लोकांचा उत्सव झाला आता असून, वाचन चळवळ देशभरात पोहोचविण्याचे काम नागरिकांकडून होत आहे. आता पुढचा टप्पा म्हणून पुण्याला पुस्तकांची राजधानी बनवायचे आहे. हा उद्देश जगभरातील लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी 'शांतता... पुणेकर वाचत आहेत' (Peace... Punekars are reading)हा उपक्रम येत्या ९ डिसेंबरला मोठ्या उत्साहात संपूर्ण पुण्यात राबविण्यात येणार आहे. या निमित्ताने विश्वविक्रम करण्यात येणार आहे. या उपक्रमात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पुणे पुस्तक महोत्सव आणि नॅशनल बुक ट्रस्टच्या ( National Book Trust-राष्ट्रीय पुस्तक न्यास) वतीने करण्यात आले आहे
एनबीटीच्या वतीने पुणे पुस्तक महोत्सव फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर येत्या १३ ते २२ डिसेंबर या कालावधीत होत आहे. या अनुषंगाने शांतता पुणेकर वाचत आहेत' हा उपक्रम येत्या ९ डिसेंबरला सकाळी ११ ते १२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, सरकारी - खासगी व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांपासून ते वाचनाची आवड असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सहभागी होता येणार आहे.
सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, डॉक्टर, वकील, पत्रकार, लेखक, साहित्यिक, शिक्षक, मुख्याध्यापक असे सर्वच आपल्या आवडीच्या पुस्तकांचे वाचन करणार आहेत. शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक वाचनालय, ग्रंथालय, धार्मिक स्थळे, सरकारी व खासगी कार्यालये, विद्यापीठे, बसस्थानक, रेल्वेस्थानक अशा सर्वच सार्वजनिक ठिकाणी पुस्तक वाचनाचा उत्सव करण्यात येणार आहे. यावेळी आपल्या आवडीचे कोणत्याही पुस्तक वाचायचे आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने विश्वविक्रम करण्यात येणार असून, पुण्याला पुस्तकांची राजधानी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या उपक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. पुण्याला पुस्तकांची राजधानी बनविण्यासाठी सर्वांनी 'शांतता..पुणेकर वाचत आहेत ' मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केले आहे. या उपक्रमाच्या माहितीसाठी पुणे बुक फेस्टीव्हलच्या सोशल मीडिया हॅण्डलला भेट देण्याचे आवाहन पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी केले आहे.
....
विश्वविक्रमात सहभागी व्हा
शांतता..पुणेकर वाचत आहेत या उपक्रमात सहभागी होऊन, विश्वविक्रमाचा भाग होण्यासाठी प्रत्येकाला येत्या ९ डिसेंबरला सकाळी ११ ते १२ या वेळेत जेथे असेल तेथे आपल्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन करायचे आहे. पुस्तक वाचन करतानाचे छायाचित्र पुणे पुस्तक महोत्सवाच्या https://photoupload.pbf25.in या वेबसाइटवर अपलोड करायचे आहे. त्याचप्रमाणे सोबत दिलेल्या क्यूआर कोडच्या माध्यमातून नोंदणी आणि फोटो अपलोड करता येणार आहे.या संपूर्ण उपक्रमाची माहिती पुणे पुस्तक महोत्सवाच्या सोशल मीडिया हँडलवर मिळेल. त्यामुळे या हँडलला भेट देण्याचे आवाहन संयोजन समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले आहे.
------------------------
'पुणे पुस्तक महोत्सव हा पुणेकरांचा उत्सव झाला आहे.महोत्सवाचा व्याप वाढत आठशे दालनांपर्यंत पोहोचला आहे. भारतातील सर्वांत मोठ्या महोत्सवांत पुणे पुस्तक महोत्सव दुसऱ्या स्थानी आहे. पुण्याला पुस्तकांची राजधानीचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून सहकार्य करण्यात येत आहे. या अंतर्गत 'शांतता...पुणेकर वाचत आहेत, हा उपक्रम यंदा ९ डिसेंबरला सकाळी ११ ते १२ या कालावधीत होणार आहे. या उपक्रमाचा विश्वविक्रम नोंदवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्यामुळे पुणेकरांनी वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी आणि जगाच्या नकाशावर पुण्याचे नाव पुस्तकांची राजधानी म्हणून कोरण्यासाठी सर्वांनी आवर्जून सहभागी व्हावे.
- राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव
eduvarta@gmail.com