ZP शाळेतील शिक्षकाकडून ४ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ
आरोपी शिक्षक विष्णू झोंबाडे हा दोन महिन्यांपूर्वीच या शाळेवर बदली करून आला होता. यापूर्वी कार्यरत असलेल्या शाळेत देखील त्याने असाच प्रकार केल्याची माहिती समोर येत आहे. "शिक्षणाचे पवित्र कार्य असताना शिक्षक असे करत असतील, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य काय?" असा प्रश्न पालक व्यक्त करत आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
बीड जिल्ह्यातून एक (Beed District Crime News) संतापजनक घटना समोर आली आहे. माजलगाव तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या एका जिल्हा परिषद शाळेत (Incidents in Zilla Parishad School) इयत्ता तिसरी ते चौथीच्या चार शालेय मुलींना (Four girls from third and fourth Class) धमक्या देऊन त्यांचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विष्णू झोंबाडे नावाच्या शिक्षकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा (Crime of sexual assault) दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यास अटक केली. या घटनेमुळे परिसरात पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
आरोपी शिक्षक विष्णू झोंबाडे हा दोन महिन्यांपूर्वीच या शाळेवर बदली करून आला होता. यापूर्वी कार्यरत असलेल्या शाळेत देखील त्याने असाच प्रकार केल्याची माहिती समोर येत आहे. "शिक्षणाचे पवित्र कार्य असताना शिक्षक असे करत असतील, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य काय?" असा प्रश्न पालक व्यक्त करत आहेत. पालकांनी येथील शाळेवर महिला शिक्षिका नियुक्ती करावी, अशी केली आहे.
हेही वाचा - व्हिएसके' घेणार विद्यार्थी व शिक्षकांची हजेरी, शाळांना मार्गदर्शक सूचना
माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या या शाळेत मागील पंधरा दिवसांपासून शिक्षक विष्णू झोंबाडे हा धमक्या देऊन इयत्ता तिसरी ते चौथीच्या वर्गातील मुलींचा लैंगिक छळ करत होता. या चार मुलींपैकी एका मुलीने ही माहिती आपल्या कुटुंबाला सांगितल्यानंतर हादरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने पोलिस स्टेशनला धाव घेतली. ग्रामीण पोलिसांनी तत्काळ शिक्षक विष्णू झोंबाडे यास अटक करून त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात लहान मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिक्षकच जर भक्षक होवून असं कृत्य करत असतील तर पालकांनी आपल्या पाल्यांना कोणाच्या भरवशावर शाळेत पाठवावे, असा संतप्त सवाल विचारला जात आहेत.
eduvarta@gmail.com