'MPSC'ची पूर्व परीक्षा आणि मतमोजणी एकाच दिवशी, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी परीक्षा ही रविवार दि. २१ आयोजित आहे. या भरती अंतर्गत विविध पदांच्या ६७४ जागा भरण्यात येणार असून यामध्ये हजारो उमेदवार सहभागी झाले आहेत.
एज्युवार्त न्यूज नेटवर्क
राज्यात २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी (Municipal Council and Nagar Panchayat Election Counting) २१ डिसेंबर रोजी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतेच (Nagpur Bench of Bombay High Court directions) दिले आहेत. माञ, याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) घेण्यात येणारी संयुक्त पूर्व गट ब (अराजपत्रित) परीक्षा (Joint Preparatory Group B Examination) आयोजित करण्यात येत आहे. त्यामुळे रविवार, दिनांक २१ डिसेंबर रोजी एमपीएससी परीक्षा आणि मतमोजणी प्रक्रिया एकाच दिवशी आल्याने उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे आता मतमोजणी आणि एमपीएससी परीक्षा नियोजन वेळेत होणार की त्यामध्ये बदल करण्यात येणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही - IIT मुंबई कॅम्पस मुलाखती सुरू, पहिल्याच दिवशी १.४८ कोटी वेतनाची प्लेसमेंट
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी परीक्षा ही रविवार दि. २१ आयोजित आहे. या भरती अंतर्गत विविध पदांच्या ६७४ जागा भरण्यात येणार असून यामध्ये हजारो उमेदवार सहभागी झाले आहेत. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी -३ पदे, राज्य कर निरीक्षक -२७९ पदे, पोलीस उपनिरीक्षक -३९२ पदे यासाठी पूर्व परीक्षा होत आहे. परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार की नाही, याबाबत उमेदवारांचे लक्ष आयोगाच्या निर्णयाकडे लागले आहे.
कोरोनानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सर्व पूर्व नियोजित वेळापपत्रक पूर्णपणे कोलमोडले आहे. कोणतेही परीक्षा वेळेत होत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावा लागत आहे. अशातच आता दि. २१ डिसेंबरला नगरपरिषद निकाल आणि त्याच दिवशी संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा असल्याने परीक्षा सतत पुढे ढकलल्या जातीस आणि त्या वेळेवर होणार का नाही? त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. ही परीक्षा होणार की पुढे जाणार, याबाबत एमपीएससीने तत्काळ स्पष्टता द्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.
eduvarta@gmail.com