प्रियदर्शनी स्कूलमध्ये स्वच्छता अभियान आणि जनजागृती

पीसीएमसीच्या अधिकाऱ्यांनी विविध वर्गांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून योग्य कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व आणि त्याचा समाजाच्या आरोग्यावर होणारा परिणाम याबद्दल मार्गदर्शन केले.

प्रियदर्शनी स्कूलमध्ये स्वच्छता अभियान आणि जनजागृती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मोशी येथील प्रियदर्शनी स्कूलमध्ये (Priyadarshini School in Moshi)पीसीएमसीमधील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान आणि जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छता, पर्यावरण स्वच्छता आणि आरोग्यदायी दैनंदिन सवयींबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठीचे उपाय, हंगामी आजारांची माहिती आणि शाळा व घराच्या परिसरात स्वच्छता राखण्याची गरज याबद्दलही विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. 

मोशी येथील प्रियदर्शनी स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून पीसीएमसीच्या अधिकाऱ्यांनी विविध वर्गांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून योग्य कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व आणि त्याचा समाजाच्या आरोग्यावर होणारा परिणाम याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना ओला आणि कोरडा कचरा वेगळा करण्याची पद्धत समजावून सांगितली. तसेच प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी सोप्या उपायांची माहिती दिली

सार्वजनिक आरोग्य टिकवणे, स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील उदाहरणे समजावून सांगण्यात आली. जनजागृती सत्रानंतर विद्यार्थी, शिक्षक आणि पीसीएमसी सदस्यांनी उत्साहाने स्वच्छतेची शपथ घेण्याच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये टीमवर्क, शिस्त आणि जबाबदारीची भावना विकसित झाली. शाळेच्या व्यवस्थापनाने आणि मुख्याध्यापकांनी पीसीएमसीच्या अधिकाऱ्यांच्या मौल्यवान मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले. हा कार्यक्रम अत्यंत माहितीपूर्ण ठरला आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता पाळणे, चांगल्या आरोग्यदायी सवयी अंगीकारणे आणि स्वच्छ व आरोग्यपूर्ण वातावरणासाठी योगदान देण्यास प्रेरित केले.