राजनाथ सिंह यांनी विचारला गणिताचा एक प्रश्न अन् ६६० ट्रेनी IAS अधिकारी गेले गोंधळून
राजनाथ सिंह यांनी अचानक ट्रेनी IAS अधिकाऱ्यांना गणिताचा प्रश्न विचारला. प्रश्न असा होता की, "एखाद्या व्यक्तीने त्याच्याकडील रकमेपैकी अर्धा भाग A ला. तृतीयांश B ला दिला आणि उरलेले 100 रुपये C ला दिले. तर त्याच्याकडे सुरुवातीला किती पैसे होते?" प्रश्न ऐकून सुरुवातीला सभागृहात शांतता पसरली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय लोकसेवा आयोग (Central Public Service Commission), म्हणजेच UPSC आपले 100 वर्षे पूर्ण (UPSC completes 100 years) करत आहे. या पार्श्वभूमीवर मसूरी येथील लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA) मध्ये आयोजित कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी ट्रेनी IAS अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपस्थितांसमोर एक गणित (A math question was posed) मांडले. पण, बहुतांश अधिकाऱ्यांना या गणिताचे उत्तर देता आले नाही. राजनाथ सिंह म्हणाले की, UPSC ने या 100 वर्षांत भारताला घडवण्याचे महान कार्य केले आहे. या प्रक्रियेत LBSNAA ने नेहमीच एक मजबूत 'हेल्पिंग हँड' म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हेही वाचा - शिक्षण मोठा दिलासा: शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाला स्थगिती
राजनाथ सिंह यांनी अचानक विचारला गणिताचा प्रश्न..
राजनाथ सिंह यांनी अचानक ट्रेनी IAS अधिकाऱ्यांना गणिताचा प्रश्न विचारला. प्रश्न असा होता की, "एखाद्या व्यक्तीने त्याच्याकडील रकमेपैकी अर्धा भाग A ला. तृतीयांश B ला दिला आणि उरलेले 100 रुपये C ला दिले. तर त्याच्याकडे सुरुवातीला किती पैसे होते?" प्रश्न ऐकून सुरुवातीला सभागृहात शांतता पसरली. काही वेळाने एका ट्रेनी अधिकाऱ्याने "3000" असे उत्तर दिले, ज्यावर रक्षामंत्र्यांनी सौम्य हसत उत्तर चुकीचे असल्याचे सांगितले. दुसऱ्या अधिकाऱ्याने "600" उत्तर दिले. हे योग्य उत्तर होते. यानंतर राजनाथ सिंह यांनी त्या गणिताचे स्पष्टीकरण दिले.
त्यांनी सूत्र मांडत सांगितले की, एकूण रक्कम = A
A ला दिलेले = A/2
B ला दिलेले = A/3
दिलेली एकूण रक्कम = 5A/6
उरलेले = A-5A/6 = 100
त्यामुळे A = 600
यातून एकूण रक्कम 600 रुपये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
'आस्था आणि विश्वास' यावर संदेश
गणिती उदाहरणानंतर राजनाथ सिंह म्हणाले की, या प्रश्नात आपण A मानतो, ते असण्याची काही हमी नसते. पण विश्वासाने A मानतो आणि त्यातून उत्तर मिळते. तसंच आयुष्यातही आस्था आणि विश्वासाच्या आधारावर अनेक समस्या सुटत असतात. यंदाच्या 100 व्या फाउंडेशन कोर्समध्ये 19 सिव्हिल सर्व्हिसेसचे 660 ट्रेनी अधिकारी सहभागी झाले होते. हा कोर्स 25 ऑगस्ट 2024 रोजी सुरू झाला आणि 28 नोव्हेंबर 2024 रोजी पूर्ण झाला.
eduvarta@gmail.com