नोकरीची संधी, SSC कॉन्स्टेबल GD २५ हजार पदांसाठी भरती सुरू

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने कॉन्स्टेबल आणि रायफलमॅन (जनरल ड्युटी) पदांच्या भरतीसाठी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी केली आहे. आयोगाने विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (CAPFS) भरतीसाठी एकूण 25 हजार 487 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. SSC GD कॉन्स्टेबल ऑनलाइन नोंदणी लिंक 1 डिसेंबर पासून उपलब्ध आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे.

नोकरीची संधी, SSC कॉन्स्टेबल GD २५ हजार पदांसाठी भरती सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

बेरोजगारीच्या काळात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने जीडी कॉन्स्टेबलच्या (Staff Selection Commission Recruitment for GD Constable) पदांसाठी बंपर भरतीची घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF), इंडो-तिबेटी सीमा पोलिस (ITBP), सशस्त्र सीमा बल, आसाम रायफल्स (AR) आणि सचिवालय सुरक्षा दल (SSB) मध्ये एकूण २५ हजार ४८७ रिक्त जागा (25 thousand 487 vacancies) भरल्या जातील. पात्र आणि इच्छुक उमेदवार ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत (Deadline is December 31, 2025) देण्यात आली आहे. 

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने कॉन्स्टेबल आणि रायफलमॅन (जनरल ड्युटी) पदांच्या भरतीसाठी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी केली आहे. आयोगाने विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (CAPFS) भरतीसाठी एकूण 25 हजार 487 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. SSC GD कॉन्स्टेबल ऑनलाइन नोंदणी लिंक 1 डिसेंबर पासून उपलब्ध आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे.

हेही वाचा - ना परीक्षा,ना मुलाखत;'इंडियन ऑइल'मध्ये २७०० जागांसाठी भरती

एसएससी व्दारे अधिसूचना अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर प्रकाशित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि रिक्त जागांची तपशीलवार माहिती तपासू शकतात. हि जाहिरात म्हणजे १० वी पास उमेदवारांना एक सुवर्णसंधीच राहील. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप शारीरिक चाचणी माहिती येथे तपासा.

सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल, तर महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) यांना शुल्क भरण्यातून सूट देण्यात आली आहे. SSC GD कॉन्स्टेबल भरती 2025 च्या भरती प्रक्रियेमध्ये संगणक आधारित परीक्षा (CBE) घेण्यात येईल. ही परीक्षा मल्टिपल चॉइस प्रश्नांसह असेल. शारीरिक मापदंड चाचणी (PST) मध्ये उमेदवाराची उंची, छाती, वजन यांचे मापदंड तपासले जातील. शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) मध्ये धावणे, उंच उडी, लांब उडी अशा कार्यक्षमतेच्या चाचण्या घेतल्या जातील. वैद्यकीय तपासणी (DME/RME)मध्ये आरोग्य चाचण्या घेतल्या जातील. कागदपत्र पडताळणी मध्ये उमेदवारांच्या सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.