SPPU : सामाजिक शास्त्र संकुलातील सभागृहाला संभाजी महाराज यांचे नाव द्या; कामगार सेनेची मागणी
सामाजिक शास्त्र संकुलात नव्याने होत असलेल्या सभागृहास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भारतीय कामगार सेनेच्या वतीने विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे निवेदनामार्फत करण्यात आली आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitrabai Phule Pune University) इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलात (Irawati Karve Social Sciences Complex New Auditorium) नव्याने होत असलेल्या सभागृहास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भारतीय कामगार सेनेच्या (Bhartiya Kamgar Sena) वतीने विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे निवेदनामार्फत करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठ आवारात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची मागणी करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात अनेक महापुरूषांच्या पुतळ्यांची स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानुसार धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना विद्यापीठाच्या आवारात करण्यासाठी संघटनेच्या वतीने पत्रव्यवहाराच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आलेला आहे. राज्य शासनाने १४ मे या दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्याचे आव्हान देखील केलेले आहे. या दिवशी नवीन सभागृहाला संभाजी महाराजांचे नाव देण्यात यावे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास हा सर्वांना चांगला ज्ञात आहे. १४ मे रोजीच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय कामगार सेना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलात नव्याने तयार होत असलेल्या सभागृहास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची विनंती कामगार सेनेच्या वतीने कुलगुरू यांच्याकडे करण्यात आली आहे. विद्यापीठाने सदर मागणीचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदे समोर ठेवून पुढील निर्णय घ्यावे, असे भारतीय कामगार सेनेच्या वतीने विद्यापीठाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.