पोलिसांची भाईगिरी! युपीएससी मेन्स उमेदवाराला कॅरेक्टर खराब करण्याची धमकी..
युपीएससी मेन्स दिलीय नीट बोला.. तु शहानपणा करू नको जास्त, सातबारा दाखव, कॅरेक्टर खराब करून टाकीन बेट्या. मी तुला काय म्हणतोय सातबारा दाखव. तुझी आहे का जमिन ही आम्ही इथे काम करत आहेत. याची व्हिडिओ शुटिंग घ्या.. पीएसआय झालेलास ना तु बघ आता, अशी दमकीच या पोलिसांने दिल्याचे दिसून येत आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शेतातून पवनचक्की कंपनीचा वीज पुरवठा टॉवरला नेला, मात्र त्याचा मावेजा (भरपाई) कंपनीकडून शेतकऱ्याला मिळाली नसल्याने शेतकऱ्यांनी टॉवरच्या कामाला विरोध केला. तेव्हा पोलिसांकडून शेतकऱ्याला धमकी दिली जात असताना शेतकऱ्याच्या मुलाने "मी युपीएससी मेन्सला (UPSC Mains Candidates) आहे, तुम्ही नीट बोला..." असे म्हटल्यानंतर पोलिसांनी थेट तरुणाचे कॅरेक्टर खराब करण्याची धमकी (Threat to tarnish character) दिली. बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील व्हिडिओ सध्या व्हायरल (The video is currently viral) होतोय.
शिक्षण संस्थेच्या नावाखाली बनावट कागदपत्र तयार करून शासनाची व प्रशासनाची फसवणूक
बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील कानडी घाट येथील शेतकरी गणेश झोडगे आणि कृष्णा कुडके यांच्या शेतातून O2 RENEWABLE या पवनचक्की कंपनीचे वीज पुरवठा करणारे टॉवर आणि तार जात आहे. कंपनीने मावेजा दिला नाही म्हणून काम करू नका असं शेतकर्यांचं म्हणणं होतं. दोन दिवसांपूर्वी दुपारी काम थांबवले असता दत्ता बळवंत, सचिन मुरूमकर आणि सचिन गर्जे हे नेकनूर पोलीस स्टेशनचे तीन पोलिस सदरील ठिकाणी दाखल झाले. दत्ता बळवंत याने थेट तरुण शेतकऱ्यांना तुझे कॅरेक्टर खराब करून टाकीन बेट्या अशा शब्दात धमकी दिली. याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.