महाज्योती खाजगी क्लास चालकांवर मेहरबान; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप 

TRTI आणि महाज्योती संस्थांव्दारे देण्यात येणाऱ्या कांत्राटांचे विश्लेषण तसेच महाराष्ट्रातील नामांकित क्लास चालक या निविदांमार्फत आपली पोळी कशाप्रकारे भाजून घेत आहेत याबद्दल माहिती देण्यात येत असल्याचे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने म्हटले आहे.

महाज्योती खाजगी क्लास चालकांवर मेहरबान; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

TRTI ने कोणत्याही एका क्लासवर कृपादृष्टी दाखविलेली नाही, उमेदवारांना उच्च दर्जाचे अनेक क्लास उपलब्ध करून दिले आहेत, क्लास कोणता निवडायचा याचा अधिकार सुध्दा उमेदवारांना दिला आहे. तर दुसरीकडे महाज्योतीने (Mahajyoti) फक्त काही ठराविक क्लासचे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत, त्या क्लास चालकांवर विशेष मेहेरबानी असल्याचे स्पष्ट दिसत आहे, असा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Examination Coordination Committee) एक्स या आपल्या सोशल मिडिया अकाउंट वर पोस्ट शेअर करत केला आहे. 

TRTI आणि महाज्योती संस्थांव्दारे देण्यात येणाऱ्या कांत्राटांचे विश्लेषण तसेच महाराष्ट्रातील नामांकित क्लास चालक या निविदांमार्फत आपली पोळी कशाप्रकारे भाजून घेत आहेत याबद्दल माहिती देण्यात येत असल्याचे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने म्हटले आहे.  ज्ञानदीप अकॅडमी, युनिक अकॅडमी असे अनेक क्लास आहेत, जिथं खरचं उमेदवार क्लास करतात का? का त्यांची हजेरी बोगस आहे की खरी याची शहानिशा करणे गरजेचे आहे. 

उमेदवारांना ऑनलाईन क्लास उपलब्ध करून द्यावा किंवा क्लास चे पैसे सरळ उमेदवारांच्या खात्यात वर्ग करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. क्लास चालकांवर सुरू असलेल्या पैशाची उधळपट्टी थांबवावी आणि या धोरणाअंतर्गत फक्त विद्यार्थी केंद्रस्थानी असावे आणि त्यांना जास्तीत जास्त रक्कम मिळावी हा आमचा हेतू आहे. आमच्या मागण्यांवर योग्य ती कार्यवाही झाली नाही तर वरील सर्वांबद्दलचे पुरावे समोर आणून सर्वांचे बिंग फोडल्याशिवाय पर्याय नसेल, असा गर्भित इशारा देखील स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून देण्यात आला आहे.