यूपीएससी : सिव्हिल सर्व्हिस मेन्स 2024 चा निकाल जाहीर
संघ लोकसेवा आयोगाने सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल प्रसिद्ध केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सिव्हिल सेवा परीक्षा (CSE) मेन्स 2024 परीक्षेसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. संघ लोकसेवा आयोग (UPSC) ने सिव्हिल सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर (Exam results announced) केला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. यामुळे अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
UPSC मेन्स सिव्हिल सेवा परीक्षा 20 ते 29 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत 14 हजार 627 उमेदवारांनी सहभाग घेतला होता. मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवार आता मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. व्यक्तिमत्व चाचणीचे वेळापत्रक आणि सूचना लवकरच अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल.
या निकालानंतर परीक्षेत यशस्वी उमेदवारांकडे शैक्षणिक प्रमाणपत्रे, वय प्रमाणपत्र, आरक्षणाशी संबंधित कागदपत्रे (EWS/OBC/SC/ST), दिव्यांगता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे मुलाखती दरम्यान सादर करावी लागतील. सिव्हिल सेवा निवड प्रक्रियेतील मुलाखत हा अंतिम टप्पा आहे, ज्यामध्ये उमेदवारांची व्यक्तिमत्व आणि निर्णयक्षमता तपासली जाते. यशस्वी उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून मुलाखतीची तयारी करावी.