UGC कडून टॉप 10 पीएच.डी. प्रबंधांना मिळणार उत्कृष्टता पुरस्कार

विज्ञान (कृषी विज्ञान, वैद्यकीय विज्ञानांसह), 'अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान', 'सामाजिक विज्ञान' (शिक्षण आणि मानविकीसह), भारतीय भाषा, 'वाणिज्य आणि व्यवस्थापन प्रवाह' या 5 विषयातून टॉप 10 प्रबंध निवडण्यात येणार आहेत.  या पाच प्रवाहांमधून दरवर्षी 2-2 पीएचडी प्रबंध निवडले जातील.

UGC कडून टॉप 10 पीएच.डी. प्रबंधांना मिळणार उत्कृष्टता पुरस्कार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारतीय विद्यापीठांमध्ये (Indian Universities) उत्कृष्ट संशोधन कार्य करणाऱ्या विद्वानांना (Scholars who have done excellent research work) आता विद्यापीठ अनुदान आयोगाकडून  (University Grants Commission) UGC 'पीएच.डी. एक्सलन्स अवॉर्ड' (PhD Excellence Award)  पुरस्कार मिळणार आहे. UGC ने देशातील टॉप 10 पीएचडी प्रबंध (Top 10 PhD Dissertations in the Country) निवडण्याचा निर्णय घेतला आहे, त्या संशोधन स्कॉलर्सना आता देशात वेगळी ओळख मिळणार आहे. 

भारतातील तसेच जगभरातील विद्यार्थी आणि शिक्षक 'पीएचडी एक्सलन्स अवॉर्ड' प्राप्तकर्त्यांच्या संशोधन कार्याबद्दल जाणून घेऊ शकतील. या उपक्रमाबद्दल माहिती देताना यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार (UGC Chairman Prof. M. Jagdish Kumar) म्हणाले की, 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या यूजीसीच्या बैठकीत भारतीय विद्यापीठांमधील उत्कृष्ट पीएचडी संशोधन कार्याला मान्यता देण्यासाठी 'पीएचडी एक्सलन्स सायटेशन्स' देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे." UGC या निर्णयाबाबत विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्यांचा अभिप्रायही घेणार आहे. विविध विषयांतील उत्कृष्ट डॉक्टरेट संशोधनाला मान्यता देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

नवीन महाविद्यालय मंजूरीची प्रक्रिया आता विधानसभा निवडणूकीनंतर ?

"राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिफारशी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरणात संशोधन कार्य आणि नाविन्यपूर्ण उपक्रमावर अधिक भर देण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशातील दर्जेदार संशोधन परिसंस्था बळकट होण्यासही मदत होईल कारण, संपूर्ण देशातून अव्वल १० जणांची निवड करणे हे मोठे आव्हान असेल आणि या आव्हानानंतर जे निवडले जातील त्यांना त्यांच्या संशोधन कार्यासाठी जग ओळखेळ," असेही जगदीश कुमार म्हणाले. 

विज्ञान (कृषी विज्ञान, वैद्यकीय विज्ञानांसह), 'अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान', 'सामाजिक विज्ञान' (शिक्षण आणि मानविकीसह), भारतीय भाषा, 'वाणिज्य आणि व्यवस्थापन प्रवाह' या 5 विषयातून टॉप 10 प्रबंध निवडण्यात येणार आहेत. या पाच प्रवाहांमधून दरवर्षी 2-2 पीएचडी प्रबंध निवडले जातील. देशातील केंद्रीय विद्यापीठे, सर्व राज्य विद्यापीठे, खाजगी विद्यापीठे आणि डीम्ड विद्यापीठांमधील संशोधन अभ्यासक या निर्णयाच्या कक्षेत असतील. 

निवड प्रक्रिया काय असेल?
या उपक्रमात दोन स्तरीय निवड प्रक्रिया असेल. विद्यापीठ स्तरावर एक स्क्रीनिंग समिती असेल आणि विद्यापीठाच्या शिफारशींवर यूजीसी निवड समिती निर्णय घेईल. उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यासाठी आणि यूजीसीकडे शिफारशी पाठवण्यासाठी विद्यापीठ स्वतःची स्क्रीनिंग समिती तयार करेल. UGC द्वारे एक ॲप्लिकेशन पोर्टल तयार केले जाईल, ज्यावर विद्यापीठे निवडलेल्या अर्जांची माहिती देतील. विजेत्यांना दरवर्षी शिक्षक दिनी म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी गौरविण्यात येईल.