प्राध्यापिकेने बनवला चक्क पेपर चेकिंगचा रिल्स ; FIR दाखल,नोकरीही धोक्यात

विद्यापीठ प्रशासनाने याप्रकरणी तातडीने कारवाई करत संबंधित प्राध्यापिके विरुद्ध एफआयआर दाखल केला. ही प्राध्यापिका एपीएस कॉलेज, नडौलच्या प्राणीशास्त्र विभागात असल्याचे सांगितले जात आहे.

प्राध्यापिकेने बनवला चक्क पेपर चेकिंगचा रिल्स ;  FIR दाखल,नोकरीही धोक्यात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

बिहारच्या पाटलीपुत्र विद्यापीठात (Patliputra University) पेपर तपासतानाचा रिल्स (Paper checking reels) बनवून रिल्स इंस्टाग्रामवर पोस्ट (Post on Instagram) करणे एका प्राध्यापिकेला चागंलेच महागात पडले आहे. कारणं या प्रकारामुळे तिच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल (FIR filed in police station) करण्यात आला आहे. त्यामुळे तिची नोकरी देखील धोका आली आहे. 

विद्यापीठ प्रशासनाने याप्रकरणी तातडीने कारवाई करत संबंधित प्राध्यापिके विरुद्ध एफआयआर दाखल केला. ही प्राध्यापिका एपीएस कॉलेज, नडौलच्या प्राणीशास्त्र विभागातील असल्याचे बोलले जात आहे.

याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ संलग्नित महाविद्यालयाच्या प्रशासकीय समितीकडे संबंधित प्राध्यापिकेला निलंबित करण्याची शिफारस केली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, कॉलेज ऑफ कॉमर्स, आर्ट्स अँड सायन्समध्ये ग्रॅज्युएशन पार्ट टू च्या मूल्यांकनाचे काम सुरू आहे. यामध्ये मुल्यांकन करताना प्राध्यापिका खुशी कुमारी वर्मा हिने स्वतःचे रील बनवून तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले. हे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून संबंधित प्राध्यापिकेवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. 

याप्रकरणी मूल्यांकन संचालकांना तातडीने कारवाई करून एफआयआर दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मुल्यांकन संचालकांनी पत्रकार नगर पोलीस ठाण्यात एफआयआरही दाखल केला आहे.तसेच मूल्यमापनाच्या कामात कोणत्याही प्राध्यापकांनी मोबाईलचा वापर करू नये, असे निर्देश सर्व मूल्यमापन केंद्रांच्या संचालकांना देण्यात आले आहेत. ही व्यवस्था काटेकोरपणे पाळली पाहिजे. या प्रकरणात अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ताकीत देण्यात आली आहे.

रील्सची लिंक खाली दिली आहे :- 

https://twitter.com/BiharTeacherCan/status/1794573931355214010