अकरावी प्रवेश : मुंबईत दीड लाख तर पुण्यात 50 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी; तुम्ही अर्ज केला का ?

मुंबई महापालिका क्षेत्रात 1 लाख 64 हजार विद्यार्थ्यांनी तर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील प्रवेशासाठी 52 हजार विद्यार्थ्यांना नोंदणी केली आहे.

अकरावी प्रवेश : मुंबईत दीड लाख तर पुण्यात 50 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी; तुम्ही अर्ज केला का ?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इयत्ता दहावीचा निकाल (Class 10th Result) जाहीर होण्यापूर्वीच शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी (Class 11th admission)ऑनालाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनालाईन नोंदणी केली असून शुक्रवारी सकाळपर्यंत मुंबई महापालिका (Mumbai Municipality) क्षेत्रात 1 लाख 64 हजार विद्यार्थ्यांनी तर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका (Pune and Pimpri Chinchwad Municipalities)क्षेत्रातील प्रवेशासाठी 52 हजार विद्यार्थ्यांना नोंदणी केली आहे. अकरावी प्रवेशासाठी ऑनालाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुमारे 8  ते 10 दिवस मुदत देण्यात आली आहे.

मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक आणि अमरावती या महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महावियालयातील आकारावीचे प्रवेश ऑनालाईन पध्दतीने केले जातात. विद्यार्थ्यांकडून वैयक्तिक माहितीचा पहिला भाग व महाविद्यालयांच्या पसंतीक्रमाचा दूसरा भाग भरून घेतला जातो. त्यानुसार काही विद्यार्थ्यांनी पहिला व दूसरा अर्ज भरून दिला आहे.राज्यात इतर पालिका कार्यक्षेत्रात प्रचलित पध्दतीने अकरावी प्रवेश केले जातात.मात्र, मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक आणि अमरावती या महापालिका क्षेत्रात केवळ ऑनालाईन पध्दतीने प्रवेश होतात.

मॅनेजमेंट कोटा, इनाहाऊस कोटा व अल्पसंख्यांक कोट्याचे प्रवेश कसे केले जातील?  याबाबत शिक्षण विभागाने संबंधित संस्थांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे एखाद्या नामांकित कॉलेज मध्ये प्रवेश मिळवून देतो, असे म्हणणाऱ्या एजंटपासून विद्यार्थी व पालकांनी सावध राहावे,असे आवाहन शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. 

-----------------------------

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी केलेले अर्ज 

पालिकेचे नाव       नोंदणी       लॉक अर्ज    ऑटो व्हेरिफाय 

पुणे/पीसीएमसी    52,848       33,722        15, 522 

मुंबई                 1,64,717    1,08,435        53,708 

नागपूर                 9,484       6,301            1,958 

नाशिक                  8,919      5,972           1,500 

अमरावती                4180    3281               382