breaking news : शिक्षक भरतीसाठी पसंतीक्रम देण्याची मुदत वाढवली... 

पसंती क्रम देण्याची मुदत येत्या 12 फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे.

breaking news : शिक्षक भरतीसाठी पसंतीक्रम देण्याची मुदत वाढवली... 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे (Department of School Education)21 हजाराहून अधिक पदांसाठी शिक्षक भरतीची (Teacher Recruitment)प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या (Pavitra portal) माध्यमातून राबवली जात आहे. गेल्या दोन दिवसात 1 लाख 18 हजार पात्रता धारकांनी पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवले आहेत. एकावेळी सुमारे 75 हजाराहून अधिक युजर्स लॉगिन करत असल्याने पोर्टल काही प्रमाणात संत होत आहे. सर्वांना पसंतीक्रम नोंदवण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी पसंती क्रम देण्याची मुदत येत्या 12 फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे, असे राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे (Education Commissioner Suraj Mandhare)यांनी सांगितले.

हेही वाचा : शिक्षण हुर्रर्रे... सकाळची शाळा आता नऊ नंतरच भरणार; शाळांच्या वेळा बदलल्या
शिक्षक भरतीसाठी दोन लाख 17 हजार अभियोग्यताधारकांपैकी एक लाख 18 हजार अभियोग्यता धारकांनी पसंतीक्रम नोंदवले आहेत. मात्र काही उमेदवारांना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने ई-मेलद्वारे तक्रारी पाठवाव्यात असे आवाहन केले आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून शिक्षण आयुक्त कार्यालयात अनेक उमेदवार आपल्या विविध अडचणी घेऊन गर्दी करत आहेत.  शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून या उमेदवारांच्या शंकांचे निरसन केले जात आहे. अनेक उमेदवारांनी चुकीची माहिती भरल्यामुळे ते या प्रक्रियेतून बाहेर गेले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने अर्ज एडिट करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काही उमेदवाराकडून केली जात आहे.

उमेदवारांना पसंतीक्रम भरण्यास अधिकाधिक वेळ मिळावा यासाठी 12 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी काही कारणास्तव पसंती क्रम नोंदवले नाहीत. त्यांनी नियोजित कालावधीमध्ये पसंतीक्रम नोंदवणे अपेक्षित आहे.

--------------

ज्यांचे पसंती क्रम देण्याचे काम पूर्ण झालेले आहे , अशा अभियोग्यताधारकांना त्यांचे पसंती क्रम लॉक करण्याची सुविधा उद्यापासून उपलब्ध करून देण्यात येईल. 

- सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य