'नव्याने वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी'साठी सुधारित कार्यपद्धती लागू 

वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर सदर प्रस्ताव शालार्थ मान्यतेकरिता शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), शिक्षण निरीक्षक यांनी वैयक्तिक मान्यतेच्या आदेशासह विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडे ई-ऑफिसमार्फत सादर करावा. याच ई-ऑफिसमधील प्रस्तावावर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षक/शिक्षकेत्तर पदावरील कर्मचाऱ्यांच्या शालार्थबाबत निर्णय घेणे आवश्यक असेल. प्रस्ताव मान्य झालेनंतर शालार्थ आदेश ई-ऑफिस जावक क्रमांकासह निर्गमित करण्यात यावेत.

'नव्याने वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी'साठी सुधारित कार्यपद्धती लागू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

राज्यातील खाजगी/ जिल्हा परिषद/ महानगरपालिका/ नगरपालिका मधील अनुदान शाळांतील (Private/ Zilla Parishad/ Municipal/ Municipal Grant School) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी (Teaching and non-teaching staff) यांना नव्याने मान्यता देणे व शालार्थ आयडी देताना नव्याने कार्यपद्धती लागू (New procedures implemented) करण्यात आली आहे. याबाबत शिक्षण संचालनालय कार्यालयाने (Office of Directorate of Education) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे राज्यातील सर्व विभागीय अध्यक्ष, सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी सर्व जिल्हा परिषद, सर्व शिक्षण निरीक्षक, शिक्षणाधिकारी सर्व महापालिका या सर्वांना तसे निर्देश दिले आहेत. 

बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या पीएचडी संशोधक विद्यार्थींच्या आंदोलनास आंबेडकरांची भेट

वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर सदर प्रस्ताव शालार्थ मान्यतेकरिता शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), शिक्षण निरीक्षक यांनी वैयक्तिक मान्यतेच्या आदेशासह विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडे ई-ऑफिसमार्फत सादर करावा. याच ई-ऑफिसमधील प्रस्तावावर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षक/शिक्षकेत्तर पदावरील कर्मचाऱ्यांच्या शालार्थबाबत निर्णय घेणे आवश्यक असेल. प्रस्ताव मान्य झालेनंतर शालार्थ आदेश ई-ऑफिस जावक क्रमांकासह निर्गमित करण्यात यावेत.

त्याचप्रमाणे विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी उच्च माध्यमिक स्तरावरील वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव व ई-ऑफिस जावक क्रमांकासह वैयक्तिक मान्यता आदेश शालार्थ मान्यतेकरिताचा प्रस्ताव ई-ऑफिसमार्फत विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ यांचेकडे सादर करावा. प्रस्ताव मान्य झाल्यास शालार्थ आयडीचे आदेश ई-ऑफिसच्या जावक क्रमांकासह निर्गमित करावेत. विभागीय शिक्षण उपसंचालक व विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ यांनी वैयक्तिक मान्यता प्रस्तावासोबत शालार्थकरिता प्राप्त झालेली कागदपत्रे व मुळ वैयक्तिक मान्यता आदेशाच्या आधारे शालार्थ मान्यतेचे/अमान्यतेचे आदेश ई-ऑफिस जावक क्रमांकासह वैयक्तिक मान्यता/शालार्थ आयडी आदेश निर्गमित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता आदेश, शालार्थ आयडी आदेश प्रत, नियुक्ती आदेश व रुजू अहवाल शालार्थ पोर्टलवर विभागीय शिक्षण उपसंचालक/विभागीय अध्यक्ष यांच्या स्तरावरून अपलोड करावेत.

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सक्षम प्राधिकाऱ्याने वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी प्रदान केलेनंतर संबंधित वैयक्तिक मान्यता आदेश प्रत, शालार्थ आयडी आदेश प्रत, संबंधित खाजगी व्यवस्थापनाचा नियुक्ती आदेश व संबंधित कर्मचा-याचा रूजू अहवाल शालार्थ पोर्टलवर अपलोड करणेबाबत डिडिओ-१ तथा मुख्याध्यापक/प्राचार्य स्तरावरून कार्यवाही करणे अनिवार्य असेल. दि. ७ नोव्हेंबर २०१२ ते १८ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत शालार्थ आयडी आदेश निर्गमित केलेले नाहीत या कालावधीमधील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांचा खाजगी व्यवस्थापनाचा नियुक्ती आदेश, रुजू अहवाल व वैयक्तिक मान्यता आदेश शालार्थ पोर्टलवर अपलोड करण्यात यावेत.

ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश, रूजू अहवाल, वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी आदेश (लागू असल्यास) ही अभिलेखे शालार्थ प्रणालीवर दि. ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत अपलोड झालेले नसल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित शिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी वैयक्तिक मान्यता आदेश आपल्या कार्यालयाकडून निर्गमित झालेले आहेत काय याची खातरजमा करावी. विभागीय शिक्षण उपसंचालक व विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचेकडून अशा प्रकरणात सदर शालार्थ आयडीचे आदेश त्यांच्या कार्यालयाकडून निर्गमित झालेले आहेत काय याची तात्काळ खातरजमा करावी.

नियुक्ती आदेश, रुजू अहवाल, वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी आदेश उपलब्ध नाहीत अशा प्रकरणात एकस्तर वरिष्ठ अधिकारी यांनी शासन निर्णय दि. २३ ऑगस्ट २०१७ प्रमाणे सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा. या वैयक्तिक मान्यतेमध्ये अनियमितता असल्यास शिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक/विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शासकीय निधीचा अपहार प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही विनाविलंब करण्यात यावी. शिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक/विभागीय शिक्षण उपसंचालक / विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी त्यांच्या कार्यालयातून निर्गमित झालेल्या वैयक्तिक मान्यता आदेश व शालार्थ आयडी आदेश एकत्रित संग्रही ठेवले जातील याची दक्षता घ्यावी, असे आदेश शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आले आहेत.