बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या पीएचडी संशोधक विद्यार्थींच्या आंदोलनास आंबेडकरांची भेट 

गेल्या दोन दिवसांपासून तिन्ही संस्थांचे संशोधक विद्यार्थी एकत्रितपणे आंदोलन करत आहेत. २०२२ पासून बार्टी ची व २०२३ नंतर सारथी आणि महाज्योतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. सरकार सातत्याने संशोधक विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. अशी तक्रार विद्यार्थीनी बाळासाहेबांकडे केली. 

बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या पीएचडी संशोधक विद्यार्थींच्या आंदोलनास  आंबेडकरांची भेट 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या (Barty, Sarathi and Mahajyoti) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचे (PhD research student) पुण्यातील एफसी रोडवरील गुडलक चौकात (Pune, FC Road, Goodluck Chowk) विविध मागण्यासंसाठी उपोषण सुरू केले आहे. यावेळी उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर (Balasaheb Ambedkar) यांनी भेट दिली. तसेच आंबेडकर यांनी उपोषणाचे केंद्र बदलून मुंबई मंत्रालय करण्याचे आवाहन केले. 

शिक्षकांचे काम वाढले; पालकांकडून चॅनल सब्सक्राइब करून घेण्याची जबाबदारी?

आंबेडकर यांनी गुडलक चौकात सुरू असलेल्या बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या पीएचडी संशोधक विद्यार्थींना उपोषणाला भेट दिली व आंदोलन विद्यार्थीचे प्रश्न समजून घेतले. गेल्या दोन दिवसांपासून तिन्ही संस्थांचे संशोधक विद्यार्थी एकत्रितपणे आंदोलन करत आहेत. २०२२ पासून बार्टी ची व २०२३ नंतर सारथी आणि महाज्योतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. सरकार सातत्याने संशोधक विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. अशी तक्रार विद्यार्थीनी बाळासाहेबांकडे केली. 

बाळासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडलेले मुद्दे - 

संशोधनापेक्षा skill development ला जास्त प्राधान्य सरकार देत आहे , हे धक्कादायक आहे. skill development ही फसवेगिरी आहे कंपनी बंद होणार असेल तर skill development चा उपयोग काय? आंदोलनाचे सेंटर बदलणं आवश्यक आहे. प्रश्न सोडायचं असेल तर पुणे पेक्षा मंत्रालया करावं. नेपाळीची परिस्थितीची पाहून सरकारला भिती आहे. महिन्याला फेलोशीफ मिळाली पाहिजे. बजेटमध्ये अडचण नाही. सरकार मान्य झालेले बजेट वापरत नाही. आणि निधी वेगवेगळ्या खात्यात चुकीच्या पद्धतीने वळवलं जातो. सेंटर निधी मिळालेला नाही. 
__________________________________________

बाळासाहेब आंबेडकर यांनी पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलन स्थळी प्रत्यक्ष भेट दिली. व विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. सर्व विद्यार्थीनी बाळासाहेबांना आपले प्रश्न सांगितले. तसेच सीपी साहेबांशी फोनद्वारे संवाद करून मुख्यमंत्री महोदयांशी विद्यार्थ्यांची भेट घडवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विद्यार्थी शिष्टमंडळसह बाळासाहेब मुख्यमंत्री महोदयांना भेटणार असल्याचे आश्वासन दिले. 

- राहुल ससाणे, आंबेडकरी विद्यार्थी कार्यकर्ता