डी.वाय. पाटील, एमआयटी, सिंहगडसह ३९ इंजिनिअरिंग काॅलेजची तपासणी; कॉलेजवर ऑब्झर्व्हरची नियुक्ती

अनियमित प्रवेशाच्या तक्रारी दाखल करण्यात आलेल्या पुणे विभागातील ३२ आणि नागपूर विभागातील ७ महाविद्यालयांचा समावेश आहे. संस्था स्तरावर प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने होत आहे का याची तपासणी निरीक्षक करतील आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे यामधील सत्यता मांडली जाईल.

डी.वाय. पाटील, एमआयटी, सिंहगडसह ३९ इंजिनिअरिंग काॅलेजची तपासणी; कॉलेजवर ऑब्झर्व्हरची नियुक्ती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये (Engineering College Admissions) संस्थात्मक स्तरावरील प्रवेश प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन (Violation of rules in the admission process) झाल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून येत असल्याने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Examination) कक्षाने (सीईटी सेल) या प्रकरणाला गांर्भि‍याने घेतले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील तब्बल ३९ इंजिनिअरिंग महाविद्यालयांवर निरीक्षकांची नेमणूक (Appointment of inspectors to colleges) केली आहे. या निरीक्षकांकडून संबंधित महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाले आहे की नाही याची तपासणी करण्यात येणार आहे.

'प्राध्यापक भरती'साठी उद्यापासून राज्यातील प्राध्यापकांचे उच्च शिक्षण संचलनालयासमोर आंदोलन

अनियमित प्रवेशाच्या तक्रारी दाखल करण्यात आलेल्या पुणे विभागातील ३२ आणि नागपूर विभागातील ७ महाविद्यालयांचा समावेश आहे. संस्था स्तरावर प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने होत आहेत का याची तपासणी निरीक्षक करतील आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे यामधील सत्यता मांडली जाईल.

प्रवेश माहिती पुस्तिकेतील नियम क्र. १३ नुसार सर्व प्रवेश कागदपत्रांची तपासणी, प्रवेशाच्या निकषांची पडताळणी आणि प्रक्रिया पार पडत असल्याची खात्री निरीक्षक करणार आहेत. तसेच प्रवेश प्रक्रियेत काही त्रुटी आढळल्यास त्याबाबत सूचना तंत्रशिक्षण संचालनालयाला केली जाईल.संस्थेतील प्रवेश प्रक्रियेबाबतचा सविस्तर अहवाल १६ सप्टेंबरपर्यंत निरीक्षकांना सादर करावा लागेल.

या ३९ महाविद्यालयांच्या यादीमध्ये पुण्यातील गेनबा मोझे कॉलेज, एमआयटी आळंदी, भारती विद्यापीठ, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज, सिंहगड कॉलेज, डी. वाय. पाटील महाविद्यालयांसह अन्य ३२ काॅलेजचा समावेश आहे. तर नागपूरातील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कमिन्स कॉलेज, सूर्योदया कॉलेज, बजाज महाविद्यालयांसह अन्य ७ काॅलेजचा समावेश आहे., याबाबत युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी सीईटीसेल कडे पाठपुरावा केला होता.त्यानंतर कॉलेजवर ऑब्झर्व्हची नियुक्ती करण्यात आली आहे.