शिक्षकांना पाच दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार, प्रशिक्षण संचालकांचे आदेश
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांची गुणवत्ता वाढावी, म्हणून पुणे येथील मुख्य कार्यालयात शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण व पर्यवेक्षीय यंत्रणेसाठी २० जानेवारीपासून प्रशिक्षण शिबिर घेतले जाणार आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (State Council of Educational Research and Training) वतीने जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांची गुणवत्ता (Improving the quality of government and private aided schools) वाढावी, म्हणून पुणे येथील मुख्य कार्यालयात शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण व पर्यवेक्षीय यंत्रणेसाठी २० जानेवारीपासून प्रशिक्षण शिबिर घेतले जाणार आहे. तसे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार (Rahul Rekhawar, Director of the Training Council) यांनी काढले आहे.
राज्य स्तरावर प्रत्येक जिल्ह्यातील निवडक प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावी इयत्तांना शिकविणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यांच्या माध्यमातून जिल्हास्तरावर आणि त्यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यातील शिक्षकांना शिक्षक सक्षमीकरणाचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणाचे आयोजन २० जानेवारीपासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद देण्यात येणार असून त्यानंतर राज्यस्तरावरील प्रशिक्षणार्थी ३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत आपापल्या जिल्हास्तरावर प्रशिक्षण देतील. १० फेब्रुवारी ते पारी ते ८ मार्चपर्यंत तालुकास्तरीय प्रशिक्षण होईल.
शिक्षक सक्षमीकरण शिबिर २० जानेवारीपासून पाच दिवसांच्या कालावधीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे होणार आहे. प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत राज्य अभ्यासक्रम आराखडा, शालेय शिक्षण, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा, क्षमताधारित मूल्यांकन, संकल्पना आदी विषयांचा समावेश आहे