शिक्षकाचा विश्वविक्रम : ५३ वर्षांपासून शिकवत आहेत एकच विषय, गिनीज बुकमध्ये झाली नोंद

पॉल यांनी  ५३ वर्षे सोशल स्टडीज हा विषय शिकवण्याचा जागतिक विक्रम केला आहे. या पराक्रमासाठी त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आले आहे.

शिक्षकाचा विश्वविक्रम : ५३ वर्षांपासून शिकवत आहेत एकच विषय, गिनीज बुकमध्ये झाली नोंद
Paul Durietz

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

जर एखाद्या व्यक्तीला त्याचे काम आवडत असेल तर तो वर्षानुवर्षे न थांबता, न थकता आणि कंटाळा न करता ते करू शकतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शिक्षकी पेशात राहून, वर्षानुवर्षे एकच विषय शिकवत अमेरिकेच्या (USA) पॉल ड्युरिट्झला (Paul Durietz) या शिक्षकाने विश्व विक्रम केला आहे.

 

पॉल यांनी  ५३ वर्षे सोशल स्टडीज (Social Studies) हा विषय शिकवण्याचा जागतिक विक्रम केला आहे. या पराक्रमासाठी त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही (Guinness Book of world Record) नोंदवण्यात आले आहे. आता ७६ वर्षांचे असलेले पॉल यांना त्यांचा व्यवसाय आणि त्यांचा विषय इतका आवडतो की, त्यांनी निवृत्तीचा विचारही केला नाही.

विद्यार्थ्यांनी लिहिले राज्यपालांना पत्र; पुण्यातील शाळा उद्या बंद?

 

विशेष म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांना खूप आवडेल अशा पद्धतीने शिकवत आहेत. पॉल यांनी १ सप्टेंबर 1१९७० रोजी सोशल स्टडीज हा  विषय शिकवण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ते एकच विषय शिकवत आहेत. पॉल ड्युरिएट्झ अजूनही या कामावर समाधानी नाही आणि त्याला स्वतःचा विक्रम मोडायचा आहे.  

 

पॉल यांना त्याच्या वडिलांमुळे इतिहासात रस निर्माण झाला. यामुळे  पॉलला सोशल स्टडीजमध्ये सर्वात जास्त शिकवायला आवडणारा विषय देखील आहे. महायुद्ध १ आणि महायुद्ध २ हे त्यांचे आवडते विषय आहेत. त्यांनी अध्यापनाची ५३ वर्षे पूर्ण केली आहेत आणि भविष्यातही ते सुरू ठेवायचे, हा त्यांचा मानस आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k