CBSE कडून काही विषयांचे अभ्यासक्रम हिंदीमध्ये प्रसिद्ध

मूल्यमापन निकष आणि मार्गदर्शक तत्त्वे हिंदीमध्ये जारी केली आहेत

CBSE कडून काही विषयांचे अभ्यासक्रम हिंदीमध्ये प्रसिद्ध
CBSC News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (CBSE) ने काही विषयांसाठीचा अभ्यासक्रम हिंदीमध्ये प्रसिद्ध केला आहे. आगामी बोर्ड परीक्षांना बसलेले विद्यार्थी cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अभ्यासक्रम तपासू शकतात. शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF) च्या मसुद्यानुसार, उच्च माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रम 20 टक्के स्थानिक माहिती, 30 टक्के  प्रादेशिक माहिती, 30 टक्के राष्ट्रीय माहिती आणि उर्वरित 20 टक्के जागतिक माहितीसह डिझाइन केला जाईल.

हेही वाचा : राष्ट्रीय कायदा विद्यापीठाने अखिल भारतीय कायदा प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर केला

CBSE बोर्डाने 10 वी आणि 12 वीसाठी अंतर्गत मूल्यमापन निकष आणि मार्गदर्शक तत्त्वे हिंदीमध्ये जारी केली आहेत. दरम्यान, CBSE बोर्डाने नुकतेच 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले.

CBSE इयत्ता 10 वी, 12 वी चा अभ्यासक्रम 2024 असा करा डाउनलोड 

* अधिकृत वेबसाइट cbseacademic.nic.in ला भेट द्या 

* मुख्यपृष्ठावर, अभ्यासक्रम टॅबवर क्लिक करा

* आता, माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक लिंक दरम्यान निवडा

* भाषा निवडा आणि नंतर PDF उघडा

* अभ्यासक्रम पहा आणि संदर्भासाठी डाउनलोड करा