नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने अखिल भारतीय विधी प्रवेश परीक्षेचा निकाल केला जाहीर

अखिल भारतीय विधी प्रवेश परीक्षा देशभरातील 35 शहरांमधील 50 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.

नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने अखिल भारतीय  विधी प्रवेश परीक्षेचा निकाल केला जाहीर
National Law University Delhi

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

 दिल्ली येथील नॅशनल लॉ विद्यापीठाने अखिल भारतीय विधी प्रवेश परीक्षेचा (AILET 2024) निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार हे निकाल तपासू शकतात आणि अधिकृत वेबसाइट Nationallawuniversitydelhi.in वर जाऊन डाउनलोड करू शकतात, असे एनएलयू दिल्लीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बीए-एलएलबी आणि एलएलएम अभ्यासक्रमांसाठी समुपदेशन प्रक्रिया येत्या 15 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सुरू होईल. 

BA-LLB साठी AILET 2024 च्या परीक्षेसाठी एकूण 18 हजार 44 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 17 हजार  174 उमेदवार परीक्षेला बसले होते. एलएलएमसाठी 1 हजार 866 उमेदवारांनी नोंदणी केली होती. 1 हजार 457 परीक्षार्थींनी परीक्षा दिली होती.

हेही वाचा : IOCL मध्ये 1800 हून अधिक शिकाऊ पदांसाठी भरती प्रक्रिया

बीए-एलएलबी (ऑनर्स), एलएलएम आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षा 10 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत झाली. अखिल भारतीय कायदा प्रवेश परीक्षा देशभरातील 35 शहरांमधील 50 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, बीए एलएलबी अभ्यासक्रमासाठी 123 जागा आणि एलएलएम अभ्यासक्रमासाठी 81 जागा आहेत. 

AILET 2024 चा निकाल असा करा डाउनलोड 

* सर्वप्रथम Nationallawuniversitydelhi.in या अधिकृत वेबसाइटवर जा. 
* मुख्यपृष्ठावरील AILET 2024 निकाल लिंकवर क्लिक करा.
* तुमचा AILET 2024 नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाका.
* तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
* निकाल डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या