CET Cell : प्रवेश प्रक्रियेतील अडचणी सोडवण्यासाठी राज्यात ३६ 'विद्यार्थी सहाय्यता केंद्र' सुरू
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया संबंधी माहिती, मार्गदर्शन तसेच प्रक्रिये दरम्यान येणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या अनुषंगाने विद्यार्थी व पालकांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहाय्यता केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती परीक्षा कक्षाकडून देण्यात आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Examination) कक्षामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया (Professional course admission process) संबंधी माहिती, मार्गदर्शन तसेच प्रक्रिये दरम्यान येणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या अनुषंगाने विद्यार्थी व पालकांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहाय्यता केंद्राची (Student Helping Center) सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती परीक्षा कक्षाकडून देण्यात आली आहे.
१० वी, १२ वीत ९० गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना १० हजारांचा विशेष गौरव पुरस्कार
ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावी, तसेच आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना तांत्रिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत सहकार्य करण्यासाठी संगणक सुविधांसह सुसज्ज अशी ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्यात येत आहेत. ही केंद्रे विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची तपासणी, समुपदेशन आणि मार्गदर्शन याबाबत मदत करतील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील दोन नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ही ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ कार्यान्वित केली जाणार आहेत. प्रवेश प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, ऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक सहाय्यता देणे, तसेच विविध शंका निरसन करणे ही या विद्यार्थी सहाय्यता केंद्रांची प्रमुख कामे असणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुरू होणाऱ्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत या केंद्रांची मदत होणार आहे.
eduvarta@gmail.com