१० वी, १२ वीत ९० गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना १० हजारांचा विशेष गौरव पुरस्कार

आयआयटी, आयआयएम, एम्स अशा नामवंत व ख्याती प्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिकाच्या पाल्यांना २५ हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल. तसेच विविध खेळ, साहित्य, संगित, गायन, वादन, नृत्य, यशस्वी उद्योजकाचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अति उत्कृष्ट कामगिरी मिळविणारे विद्यार्थी यामध्ये सहभागी होवू शकतात.

१० वी, १२ वीत ९० गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना १० हजारांचा विशेष गौरव पुरस्कार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ९० टक्के पेक्षा जास्त गुण (More than 90 percent marks in 10th and 12th standard) प्राप्त करून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या पाच माजी सैनिक,पत्नी यांच्या पाल्यांना रुपये १० हजाराचा विशेष गौरव पुरस्कार (Special Honor Award) देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी माजी सैनिकांच्या कुटूंबियांनी ३१ ऑगस्ट, २०२५ पर्यंत याबाबत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मुंबई शहर (District Soldier Welfare Officer Mumbai City) यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलासोबत शारीरिक संबंध ठेवलेल्या शिक्षिकेला 'या' अटींवर जामीन मंजूर

आयआयटी, आयआयएम, एम्स अशा नामवंत व ख्याती प्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिकाच्या पाल्यांना २५ हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल. तसेच विविध खेळ, साहित्य, संगित, गायन, वादन, नृत्य, यशस्वी उद्योजकाचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अति उत्कृष्ट कामगिरी मिळविणारे विद्यार्थी यामध्ये सहभागी होवू शकतात.

तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी पार पाडणारे, देश आणि राज्याची प्रतिष्ठा वाढेल अशा स्वरुपाचे लक्षणीय कामगिरी करणारे माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि पाल्य, यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तरी पात्रता धारक लाभार्थीनी दूरध्वनी क्र ०२२- ३५१८३८६१ / ८५९१९८३८६१ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मुंबई शहर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. त्यामुळे राज्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना या विशेष गौरव पुरस्कारात सहभागी होता येणार आहे.