शिक्षक भरतीच्या मुद्द्यावर रोहित पवार आक्रमक

टी शर्टवर विविध मागण्या लिहून आणत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

शिक्षक भरतीच्या मुद्द्यावर रोहित पवार आक्रमक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

हिवाळी अधिवेशनात विविध मुद्द्यांवर गांभीर्याने चर्चा होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी टी शर्टवर विविध मागण्या लिहून आणत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नको पोकळ घोषणा साठ हजार शिक्षक भरती करा,(Teacher Recruitment) समुह शाळा, दत्तक शाळा योजना मागे घ्यावी, आदी मागण्या त्यांनी टी शर्टवर लिहून आणल्या होत्या.

राज्यात शिक्षक ६० हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. मात्र, अद्याप शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. ' लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी. समूह शाळा योजना राज्य शासनाने स्थगित करून माघार घ्यावी. तसेच दत्तक पालक योजनेचे नवीन भूत या खाजगी लोकांसाठी सरकारने आणले आहे, ते सुद्धा मागे घ्यावे,' अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

हेही वाचा : केंद्राने दोन वर्ष विद्यार्थी शिष्यवृत्तीची रक्कम का रखडवली ; विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विचारला जाब

राज्यातील शिक्षक भरतीला आणखी पंधरा दिवस लागणार असल्याचे स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिले आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी आहेस प्रतीक्षा करावी लागणार आहे.