DMER पदभरती! पावसामुळे पुढे ढकललेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध..
संचालनालयाच्या सुचनेनुसार दि. २५, २६ व २९ सप्टेंबर २०२५ रोजीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आता या परीक्षा १३ ते १५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. या परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेशपत्र त्यांच्या लाॅगीन आयडीवर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, याची विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी या यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या (Department of Medical Education and Pharmaceuticals) अधिपत्याखालील शासकीय दंतमहाविद्यालय व संलग्न रुग्णालयातील गट-क तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील सरळसेवा कोट्यातली रिक्त पदे भरण्यास घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध (Revised schedule announced) करण्यात आले आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार , आता या परीक्षा १३ ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत घेण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन व आयुष आयुक्तालयाने सूचना पत्र प्रसिद्ध (Notice letter published) केले आहे.
विद्यापीठातील अध्यापक भरती प्रक्रियेस मान्यता; शासन निर्णय प्रसिद्ध
देण्यात आलेल्या माहितीनुसार, संचालनालयाच्या सुचनेनुसार दि. २५, २६ व २९ सप्टेंबर २०२५ रोजीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आता या परीक्षा १३ ते १५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. या परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेशपत्र त्यांच्या लाॅगीन आयडीवर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, याची विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी या यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील अनेक भागांत मागील आठवड्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. या आपत्कालीन परिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा शासन निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे पावसामुळे जिकिरीचे व अडचणीचे ठरणार होते. या अनुषंगाने सर्व परीक्षार्थीचे पुढील होणारे नुकसान टाळण्यासाठी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री मिसाळ यांनी तत्काळ परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेश दिले. तसेच वैद्यकीय शिक्षण व आयुष आयुक्तालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, २५ व २६ सप्टेंबर २०२५ रोजी होणार्या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले. यासंदर्भातील सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार असल्याचे आयुक्तालयाने स्पष्ट केले होते. त्यानुसार आता सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.