GATE 2025 परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध 

येत्या 1 ते 16 फेब्रुवारी 2024 दरम्यान या परीक्षा घेण्यात येतील. उमेदवार अधिकृत वेबसाइट gate2025.iitr.ac.in वर  GATE परीक्षेचे वेळापत्रक तपासू शकतात. 

GATE 2025 परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकी (Indian Institute of Technology, Roorkee) IIT Roorkee ने अभियांत्रिकीमधील पदवीधर अभियोग्यता चाचणी (Graduate Aptitude Test in Engineering) GATE 2025 साठी विषयवार वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. (Subject wise schedule has been published) येत्या 1 ते 16 फेब्रुवारी 2024 दरम्यान या परीक्षा घेण्यात येतील. उमेदवार अधिकृत वेबसाइट gate2025.iitr.ac.in वर  GATE परीक्षेचे वेळापत्रक तपासू शकतात. 

ही परीक्षा दररोज दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली शिफ्ट सकाळी 9.30 वाजता सुरू होईल तर दुसरी शिफ्ट 2.30 वाजता सुरू होईल. पहिल्या शिफ्टसाठी  रिपोर्टिंगची वेळ सकाळी 8 वाजता आणि दुसऱ्या सत्रासाठी दुपारी 1 वाजता आहे. उमेदवारांनी सकाळच्या सत्रासाठी 8.50 वाजता आणि दुपारच्या सत्रात 1.50 वाजता जागेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे.   
 
ही परीक्षा एकूण 30 चाचणी पेपरसाठी घेतली जाईल. उमेदवार फक्त एक किंवा दोन चाचणी पेपरसाठी उपस्थित राहू शकतात. उमेदवारांनी प्रवेशपत्राची प्रिंटआऊट परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाणे आवश्यक आहे.