राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत रमेश कचरे प्रथम 

राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत रमेश कचरे प्रथम 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुण्यातील येरवडा येथील डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत वरिष्ठ (पदवी) विभागातून सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील रमेश कचरे या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक पटकाविला. 

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.गौतम बनसोडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनखाली ही वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ.डी.जी.देशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेसाठी प्रा.रुपाली अवचरे, प्रा.जगदीश गाणार यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रेरणा उमरखेडी, प्रा.शिवाजी मोटेगावकर, प्रा. रमेश साळुंखे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

या स्पर्धेत वरिष्ठ विभागातून प्रथम क्रमांक- रमेश कचरे (सर परशुरामभाऊ महाविद्यालय), व्दितीय क्रमांक - वसुधा पाटील (एच.व्ही.देसाई महाविद्यालय), तृतीय क्रमांक -  ऋषिकेश शिंदे (आयटीएम महाविद्यालय, नांदेड), चतुर्थ क्रमांक - यश तांबे ( डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड), अतुल लोंढे (शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई), उत्तेजनार्थ - मयुरी कदम (डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड) याप्रमाणे विद्यार्थ्यांनी क्रमांक प्राप्त करत पारितोषिक मिळविले. 

कनिष्ठ विभागातून प्रथम क्रमांक - प्रियंका जोगदंड (फर्ग्युसन महाविद्यालय), व्दितीय क्रमांक - हुराबी शेख ( डॉ. आंबेडकर महाविद्यालय, येरवडा), उत्तेजनार्थ - करण ढगे (डॉ.आंबेडकर महाविद्यालय, येरवडा) यांनी या प्रमाणे क्रमांक प्राप्त केले. ही स्पर्धा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आली होती. सुत्रसंचालन प्रा. डॉ. श्रेयसी परब, प्रा. सुवर्णा कांबळे यांनी केले. आभार प्रा. डॉ.वर्षाराणी वाघमारे, प्रा.मंजुषा खोपडे यांनी मानले. 
---------------------