विद्यार्थ्यांना विविध गोष्टीचे ज्ञान देणारा उपक्रम – प्रा. यशोमती निगडे

शालेय विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी दोन दिवसीय ‘रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड’ अर्थात रायला आयोजित करण्यात आला होता.

विद्यार्थ्यांना विविध गोष्टीचे ज्ञान देणारा उपक्रम – प्रा. यशोमती निगडे

रोटरी क्लब ऑफ बारामतीचा 'रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड’ संपन्न

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यार्थ्यांना (students) विविध गोष्टीचे ज्ञान देण्याचा रोटरी इंटरनॅशनलचा (Rotary International) 'रायला' (Raila) हा उपक्रम अतिशय चांगला आहे. रायलामध्ये होणारी व्याख्याने आणि प्रात्यक्षिके (Lectures and demonstrations) मुलांना व्यक्तिमत्व विकासात नक्कीच उपयोगी पडतील असे मत सायरस पुनावाला शाळेच्या प्राचार्या यशोमती निगडे (Cyrus Punawala School Principal Yashomati Nigde) यांनी व्यक्त केले आहे. रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या (Rotary Club of Baramati) वतीने शालेय विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी दोन दिवसीय ‘रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड’ (Rotary Youth Leadership Award) अर्थात रायला आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यशाळेतील पहिल्या दिवशी विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. विजय काकडे, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि प्रसिद्ध हस्ताक्षर तज्ज्ञ कृष्णा कुदळे, भारत ज्ञान विज्ञान समुदायचे बारामती तालुका सचिव नौशाद बागवान यांच्या सोबतीने राजू बालगुडे गुरुजी आणि प्रा. प्राजक्ता पवार – यादव यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात शिवानी सपकळ यांच्या योगा आणि झुंबाने करण्यात आली. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात मुजताबा लोखंडवाला, प्रसिद्ध आहार तज्ज्ञ सुभाषिनी दरेकर, प्रा. डॉ. अजय दरेकर यांनीही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर माहिती दिली.

या कार्यशाळेत रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष अरविंद गरगटे, युथ डायरेक्टर अक्षय महाडिक, प्रा. डॉ. अजय दरेकर, सहाय्यक प्रांतपाल राकेश गाणबोटे, रोटरीचे सचिव रविकिरण खारतोडे, प्रा. डॉ. हणमंतरावं पाटील, पार्शवेंद्र फरसोले, दर्शना गुजर, शिवदास गुजरे, अब्बास नाशिकवाला, हर्षवर्धन पाटील, अलीअसगर बारामतीवाला, बाळासाहेब जगताप, प्रिती पाटील, शीतल कोठारी, जयश्री पाटील, मल्लिकार्जुन हिरेमठ, दत्ता बोराडे, संजय दुधाळ, रसिका गुजरे, स्मिता बोराडे अनुजा गरगटे, अथर्व गरगटे, तसेच सायरस पुनावाला, बालविकास, अनेकांत, जनहित, शारदाबाई पवार, विद्या प्रतिष्ठानच्या इंग्रजी माध्यम या शाळांमधील सुमारे शंभरहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.