व्हिजन इंग्लीश मेडियम स्कूलमधील पालकांनी फी वाढी विरोधात उठवला आवाज

शाळेने फी वाढ जाहीर केल्यानंतर एक महिन्याच्या आत सर्व पालकांनी शाळेच्या सदर फी वाढीस विरोध दर्शवला होता. त्यासाठी पालकांनी जवळपास ८०० मुख्यामंत्री व शिक्षणमंत्री यांना स्व हस्ताक्षरात फीवाढ रद्द करावी असे पोस्टकार्ड पाठवले. शाळेच्या वार्षिक AGM मध्ये पालकांनी फीवाढ विरोधात आवाज उठवला. CEC मेम्बर्स यांनी शाळा संस्थेच्या वरिष्ठांची भेट घेऊन फीवाढ रद्द करण्याची विनंती केली, मात्र काहीच होत नसल्याचे पालक हवालदिल झाले आहेत.

व्हिजन इंग्लीश मेडियम स्कूलमधील पालकांनी फी वाढी विरोधात उठवला आवाज

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल नन्हे (Vision English Medium School Nanhe) येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी फी वाढ केल्यामुळे शाळेविरोधात आवाज उठवला (Raised voice against fee hike) आहे. शाळेने सलग तिसऱ्या वेळेस केलेल्या बेकायदेशीरनियमबाह्य फीवाढी (Illegal and irregular fee hike) संदर्भात आम्ही केलेल्या तक्रार अर्जावर त्वरित कार्यवाही करावी यासाठी आम्ही पालकांनी अनेक वेळा पाठपुरावा करून देखील विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे (Deputy Director of Divisional Education, Pune) यांच्या कार्यालयाकडून कार्यवाहीस विलंब केला जात नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे.

UPSC संयुक्त संरक्षण सेवा CDS (II) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

शाळेने फी वाढ जाहीर केल्यानंतर एक महिन्याच्या आत सर्व पालकांनी शाळेच्या सदर फी वाढीस विरोध दर्शवला होता. त्यासाठी पालकांनी जवळपास ८०० मुख्यामंत्रीशिक्षणमंत्री यांना स्व हस्ताक्षरात फीवाढ रद्द करावी असे पोस्टकार्ड पाठवले. शाळेच्या वार्षिक AGM मध्ये पालकांनी फीवाढ विरोधात आवाज उठवला. CEC मेम्बर्स यांनी शाळा संस्थेच्या वरिष्ठांची भेट घेऊन फीवाढ रद्द करण्याची विनंती केली, मात्र काहीच होत नसल्याचे पालक हवालदिल झाले आहेत.

सदर तक्रारीवर अपर सचिव, मंत्रालय यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे. यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश काढले आणि विभागीय प्रशासकीय अधिकारी यांनीदेखील त्यांचा अहवाल हा उपसंचालक ऑफिस ला तातडीने दिला. परंतु सदर प्रकरणावरील कार्यवाहीवर विभागीय शिक्षण, उपसंचालक, पुणे या कार्यालयाकडून खूपच दिरंगाई केली जात आहे. तरी आम्ही सर्व पालकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे यांना अर्जाद्वारे विनंती केली आहे कि आपण सदर तक्रारीवर त्वरित कार्यवाही करून सहकार्य करावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.