मुंबई उच्च न्यायालयातील विविध पदभरती अर्जासाठी मुदतवाढ
या भरती मोहिमेअंतर्ग विविध पदांच्या एकूण २ हजार ३३१ जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वाधिक लिपिक पदांच्या १ हजार ३३२ जागा, शिपाई पदाच्या ८८७ जागा, चालक पदाच्या ३७ जागा लघुलेखक (उच्च श्रेणी) १९ जागा आणि लघुलेखक (निम्न श्रेणी) साठी ५६ जागा भरण्यात येणार आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court Recruitment) अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी अद्याप अर्ज नाही केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. या भरती अर्जासाठी १६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक, शिपाई, चालक, स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी), स्टेनोग्राफर (कमी श्रेणी) (Recruitment for the posts of Clerk, Soldier, Driver, Stenographer) पदाच्या २ हजार ३३१ रिक्त जागा (2 thousand 331 vacancies) भरण्यात येणार आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. यापूर्वी देण्यात आलेली अर्ज करण्याची मुदत संपुष्टात असल्यानंतर आता १६ जानेवारी २०२६ मुदतवाढ (Extension until January 16, 2026) देण्यात आली आहे आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी प्राप्त झाली आहे.
हेही वाचा - नमाज पठण करायला सांगून विद्यार्थिनीचे रॅगिंग; मेडिकल कॉलेजमधील प्रकार
या भरती मोहिमेअंतर्ग विविध पदांच्या एकूण २ हजार ३३१ जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वाधिक लिपिक पदांच्या १ हजार ३३२ जागा, शिपाई पदाच्या ८८७ जागा, चालक पदाच्या ३७ जागा लघुलेखक (उच्च श्रेणी) १९ जागा आणि लघुलेखक (निम्न श्रेणी) साठी ५६ जागा भरण्यात येणार आहेत. मुंबई उमेदवार मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकृत संकेतस्थळ https://bombayhighcourt.nic.in/index.php वर जाऊन अर्ज भरू शकतात.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार असणार आहे. स्टेनोग्राफर लघुलेखक (उच्च श्रेणी) पदासाठी उमेदवारा हा कोणत्याही विद्यापीठातील पदवीधर असणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्याच्याकडे शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. कोर्सचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. लघुलेखक (निम्न श्रेणी) पदासाठी पदवीधर असावा, आणि त्याच्याकडे शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. लिपिक पदासाठी उमेदवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे. संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि), MS-CIT किंवा समतुल्य कोर्स केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. चालक पदासाठी उमेदवार १० उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे हलके मोटार वाहन चालक परवाना व 3 वर्षे अनुभव आवश्यक आहे. तर शिपाई पदासाठी किमान ७ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा व परीक्षा शुल्क
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 8 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तर भरती नियमानुसार, मागासवर्गीय विद्यार्थांना 5 वर्षे सूट देण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व प्रवर्गातील उमेदवारांना १ हजार रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आला आहे.
