शिक्षण विभागात गोंधळ : अचानक सुट्टी जाहीर केल्याने पॅट परीक्षेचे वेळापत्रक कोडमडले

गुरूवारी उशिरा काढलेल्या परिपत्रकात सुट्टीबाबत काही बदल जाहीर करण्यात आले, त्यामुळे पॅट परीक्षा केंद्रांवरील नियोजनाचा संभ्रम वाढला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण पॅट परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले आहे. सामान्य प्रशासन विभागाने अचानक सुट्ट्यांमध्ये बदल केल्याने हा गोंधळ उडाल्यचे दिसून येत आहे.

शिक्षण विभागात गोंधळ : अचानक सुट्टी जाहीर केल्याने पॅट परीक्षेचे वेळापत्रक कोडमडले

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यभरात ६ ते ८ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅट परीक्षेच्या (PAT Exam Schedule) पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने (School Education Department) अचानक जाहीर केलेल्या सुधारित सुट्ट्यांमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरूवारी उशिरा काढलेल्या परिपत्रकात सुट्टीबाबत काही बदल (Change between two holidays) जाहीर करण्यात आले, त्यामुळे पॅट परीक्षा केंद्रांवरील नियोजनाचा संभ्रम वाढला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण पॅट परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले आहे. सामान्य प्रशासन विभागाने अचानक सुट्ट्यांमध्ये बदल केल्याने हा गोंधळ उडाल्यचे दिसून येत आहे.

CTE CELL: वैद्यकीय, दंत अभ्यासक्रम प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल, १३ ऑगस्टला गुणवत्ता यादी

शिक्षण विभागाने राज्यभर ६ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दरम्यान पॅट परीक्षेचे आयोजन केलेले आहे. आज ८ ऑगस्ट रोजी शाळांमध्ये इंग्रजी विषयाचा पेपर होणार होता. मात्र, गुरूवारी अचानक प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित सुट्ट्यांबाबतच्या निर्णयाने शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक, मुख्याध्यापकांना नियोजन करायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. सुधारित परिपत्रकामुळे परीक्षेच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. परीक्षेचे पेपर उशिरा आल्यामुळे तसेच पेपर कमी आल्यामुळे यापूर्वीच गोंधळ उडाला होता. त्यात सुट्ट्यांच्या या घोषणेमुळे भर पडली आहे.

सुधारित परिपत्रकामध्ये १६ ऑगस्ट रोजी गोपाळकाल्याची सुट्टी आणि गणपती विसर्जनाची ६ सप्टेंबरची अनंत चतुर्दशीची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी नारळी पौर्णिमा ८ ऑगस्ट व गौरी विसर्जनाच्या दिवशी सुट्टी देण्यात येणार आहे. हे सर्व नियोजन यापूर्वीच केले असते तर गोंधळ उडाला नसता, असे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे. यापूर्वी शिक्षण विभागाकडे पत्राद्वारे विनंती केली होती की, शाळांचे नियोजन वर्षाच्या सुरुवातीलाच करावे, अचानक नियोजनात बदल केल्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होते, असे देखील काही शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.