CTE CELL: वैद्यकीय, दंत अभ्यासक्रम प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल, १३ ऑगस्टला गुणवत्ता यादी
नव्या वेळापत्रकानुसार वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना ८ ते ११ ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार आहे. पहिली गुणवत्ता यादी १३ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच १४ ते २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायाचा असल्याचे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (National Commission for Medical Sciences) वैद्यकीय समुपदेशन समितीने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकामध्ये बदल (Changes in medical course schedule) केल्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Examination) कक्षाकडून (सीईटी कक्ष) वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकात बदल (Changes in the schedule of medical and dental courses) करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्यासाठी आता ८ ऑगस्टपासून सुरूवात करण्यात येणार आहे. तर पहिली अंतिम गुणवत्ता यादी १३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जवळपास ६४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या ८ ऑगस्ट रोजी होणार्या सर्व परीक्षांच्या वेळापत्रकात बदल
एमसीसीच्या वेळापत्रकानुसार ६ ऑगस्ट रोजी सीईटी कक्षाने अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर करून जागांचा तपशीलही जाहीर केला. मात्र,महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरण्यासाठीच्या मुदतीमध्ये एमसीसीने बदल केल्याने सीईटी कक्षाकडून त्यात बदल करण्यात आला. त्यामुळे नव्या वेळापत्रकानुसार वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना ८ ते ११ ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार आहे. पहिली गुणवत्ता यादी १३ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच १४ ते २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायाचा असल्याचे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.
नीट यूजी २०२५ परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल एक महिन्याने वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) अखिल भारतीय कोट्याचे वेळापत्रक जाहीर केले. त्याचवेळी राज्य कोट्यातील प्रवेश प्रक्रिया राबविण्यांसदर्भातही सूचना देण्यात आल्या. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने राज्य कोट्याअंतर्गत एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी या अभ्यासक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली.
eduvarta@gmail.com