गोखले इन्स्टिटयूटच्या कुलगुरू निवडीवर आक्षेप;पण युजीसीचे पत्र मिळालेच नाही

अद्याप गोखले इन्स्टिटयूटला याबाबतची नोटीस मिळाली नाही. मात्र, तरीही त्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे विद्यापीठचे विद्यापीठातर्फे सांगितले जात आहे.

गोखले इन्स्टिटयूटच्या कुलगुरू निवडीवर आक्षेप;पण युजीसीचे पत्र मिळालेच नाही

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील विद्यापीठांच्या कुलगुरू व कुलसचिव (Vice-Chancellor and Registrar)पदाबाबत वादग्रस्त तक्रारी समोर येत आहेत.पुण्यातील गोखले इन्स्टिटयूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (Gokhale Institute of Politics and Economics)या नामांकित विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या नियुक्तीबाबतही वाद (Controversy over Vice-Chancellor selection)निर्माण झाला आहे. यूजीसीने या संस्थेला नोटीस बजावली असल्याचे बोलले जात आहे.मात्र,अद्याप गोखले इन्स्टिटयूटला याबाबतची नोटीस मिळाली नाही. मात्र, तरीही त्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे विद्यापीठचे विद्यापीठातर्फे सांगितले जात आहे.

गोखले इन्स्टिटयूटचे कुलगुरू डॉ.अजित रानडे (Vice Chancellor of Gokhale Institute Dr. Ajit Ranade)यांनी युजीसीच्या नियमावलीप्रमाणे  शैक्षणिक पात्रता नाही. तरीही रानडे यांची कुलगुरू पदी नियुक्ती करण्यात आली आहे,अशी लेखी तक्रार मुरली कृष्णा यांनी यूजीसीकडे केली.त्यावर युजीसीने गोखले इन्स्टिटयूटच्या कुलपतींना याबाबत पत्र पाठवले.मात्र, विद्यापीठातर्फे युजीसीकडे या संदर्भात संवाद साधला जात असून या पात्राचे उत्तर दिले जाणार आहे. 
दरम्यान, गोखले इन्स्टिटयूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेच्या कुलगुरू निवडीसाठी कुलगुरू शोध समिती स्थापना करण्यात आली होती.या शोध आणि निवड समितीने रानडे यांच्याकडे कुलगुरू पदासाठी आवश्यक पात्रता नसताना त्यांनी निवड केल्याचा आरोप मुरली कृष्णा यांनी केला आहे.मात्र, कुलगुरू निवडीसाठी युजीसी प्रतिनिधी तसेच राज्य शासनाचे प्रतिनिधी असतात.त्यामुळे मुरली कृष्णा यांनी केलेल्या आरोपात किती तथ्य आहे. हे तपासावे लागेल.
---------------------------------------
कुलगुरू निवडीच्या तक्रारी संदर्भातील पत्र विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यालयाला अद्याप प्राप्त झाले नाही.युजीसीचे पत्र थेट कुलपती यांना पाठवले गेले होते.मात्र, आम्ही युजीसीशी संपर्क साधत आहोत.तसेच युजीसीने आम्हाला या संदर्भात पत्रव्यवहार केल्यास पात्राचे उत्तर दिले जाईल.कुलगुरू निवडीसाठी युजीसीकडून समिती आली होती.त्यांनी पात्रतेच्या सर्व बाबी तपासल्या आहेत. 
- डॉ.अजित रानडे, कुलगुरू , गोखले इन्स्टिटयूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स