SSC : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १८७१ सब-इस्पेक्टर पदांसाठी अधिसूचना जाहीर
कर्मचारी चयन आयोगाने दिल्ली पोलिस तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमधील सब-इन्स्पेक्टर पदांसाठी २०२६ च्या परीक्षेची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या मोठ्या भरती प्रक्रियेद्वारे अनेक रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पुरुष आणि महिला दोघांनाही अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
कर्मचारी चयन आयोगाने दिल्ली पोलिस तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमधील सब-इन्स्पेक्टर पदांसाठी २०२६ च्या परीक्षेची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या मोठ्या भरती प्रक्रियेद्वारे एकूण १८७१ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.जागा भरल्या जाणार आहेत. पुरुष आणि महिला दोघांनाही अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया १० सप्टेंबर २०२६ रोजी सुरू झाली असून ती ३० सप्टेंबर २०२६ च्या रात्री ११ वाजेपर्यंत खुली राहील. ही सरकारी नोकरीची महत्त्वाची संधी असल्याने पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क १०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. महिला उमेदवार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि पात्र माजी सैनिक यांना शुल्कातून संपूर्ण सूट देण्यात आली आहे. शुल्क भरण्याची अंतिम मुदत १ ऑक्टोबर २०२६ रात्री ११ वाजेपर्यंत आहे. अर्जात काही चुका राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी ८ ते १० ऑक्टोबर २०२६ दरम्यान ऑनलाइन करेक्शन विंडो उपलब्ध राहील. या दुरुस्तीसाठी वेगळे शुल्क आकारले जाईल. उमेदवारांनी अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी.

पात्रतेसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे. सीआयएसएफमधील सब-इन्स्पेक्टर पदासाठी विज्ञान शाखेतील पदवी अथवा अभियांत्रिकी डिप्लोमा असणे बंधनकारक आहे. निवड प्रक्रिया कॉम्प्युटर आधारित परीक्षा पेपर-१ आणि पेपर-२, शारीरिक मानक चाचणी, शारीरिक क्षमता चाचणी तसेच वैद्यकीय तपासणी या टप्प्यांमधून पूर्ण होईल. या सर्व टप्प्यांत यशस्वी झाल्यानंतरच उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
उमेदवारांनी कर्मचारी चयन आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन संपूर्ण अधिसूचना, परीक्षा वेळापत्रक आणि इतर अद्ययावत माहिती तपासून घ्यावी. वेळेत अर्ज करून आणि तयारी सुरू ठेवून ही सुवर्णसंधी साधता येईल. दिल्ली पोलिस आणि सीएपीएफमधील सब-इन्स्पेक्टर पद हे सुरक्षित आणि प्रतिष्ठित करिअरचे दार उघडते. सर्व पात्र युवक-युवतींनी ही संधी गमावू नये आणि अधिकृत मार्गानेच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.