राजकीय पक्षाकडून किंवा अपक्ष निवडणूक लढणारच : डॉ. अरुण अडसूळ

अजूनही करमाळा तालुक्याचा हवा त्या प्रमाणात विकास होऊ शकला नाही.

राजकीय पक्षाकडून किंवा अपक्ष निवडणूक लढणारच : डॉ. अरुण अडसूळ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रातील राजकारणाची सद्यस्थिती पाहता सुशिक्षित व उच्च विभूषित लोकांनी हातावर हात ठेवून बसणे योग्य नाही. राजकारणाचा दर्जा उंचायलाच हवा. तरुणांचे, बेरोजगारांचे, स्थानिकांचे प्रश्न (Issues of youth, unemployed, locals) सुटायला हवेत. माध्यमिक शिक्षक ते कुलगुरू या पर्यंतच्या प्रवासात आलेल्या अनुभवाचा शासनात आलो तर निश्चितच उपयोग होईल. त्यामुळे संधी मिळाली तर एखाद्या राजकीय पक्षाकडून अन्यथा अपक्षपणे मी करमाळा विधानसभा निवडणूक (Karmala Assembly Election)लढणार आहे, असे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण अडसूळ (Senior educationist Dr. Arun Adsul) यांनी 'एज्युवार्ता' ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.

भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ  डॉ. अरुण अडसूळ यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत 'एज्युवार्ता' ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी  निवडणूक लढविण्याची भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा : शिक्षण विद्यार्थ्यांसाठी खुशखबर: नवीन वर्षापासून कमवा व शिका मानधन प्रतितास ५५ रुपये

अडसूळ म्हणाले, राज्याच्या स्थापनेपासूनचा विचार केला तर अजूनही करमाळा तालुक्याचा हवा त्या प्रमाणात विकास होऊ शकला नाही. येथे युवकांच्या बेरोजगारीसह शिक्षणाशी निगडित अनेक गंभीर प्रश्न आहेत. पिण्याच्या पाण्यापासून ते उघड्या ड्रेनेजपर्यंतचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणात उतरावे असे मला वाटले. मी निवडणूक लढवताना मूल्य आणि माणुसकीचा धर्म पाळणार आहे . सर्व राजकीय पक्षांच्या ध्येय धोरणांचा आणि परंपरेचा मला अभ्यास आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाबरोबर जायचे याचा निर्णय मी अद्याप घेतलेला नाही.

मी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याबरोबर काही राजकीय पक्षांनी माझ्याशी संपर्क साधला तसेच आमचा विचार करावा,असेही बोलून दाखवले. माझे गाव करमाळा तालुक्यात असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत विजय होवो किंवा पराजय होवो मी निवडणूक लढणार आहे, अडसूळ यांनी स्पष्टपणे सांगितले.